World Music Day esakal
नाशिक

जागतिक संगीत दिन : संगीताची आवड जोपासणारा अवलिया

जागतिक संगीत दिनानिमित्त तुषार लोणकर यांच्‍या या आगळ्यावेगळ्या छंदाविषयी संवाद साधत माहिती जाणून घेतली.

सकाळ डिजिटल टीम

पल्लवी कुलकर्णी : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : इंदिरानगर येथील रहिवासी तुषार लोणकर हे निवृत्त पोस्‍टमन. ३५ वर्षांपासून आपलाल्या संगीताप्रति असलेल्‍या प्रेमाने प्रसिद्ध गायकांच्या कॅसेट्स गोळा करणे व वेळ मिळेल तेव्हा संगीत ऐकणे हा त्‍यांचा छंद. त्‍यांच्‍याकडे नऊशे ते हजार कॅसेट्‌सचा संग्रह आहे. मंगळवारी (ता.२१) जागतिक संगीत दिनानिमित्त लोणकर यांच्‍या या आगळ्यावेगळ्या छंदाविषयी संवाद साधत माहिती जाणून घेतली.

‘सकाळ’शी संवाद साधताना संगीताविषयीचे प्रेम त्‍यांनी उलगडून दाखविले. तुषार लोणकर यांना लहानपणापासूनच वडिलांच्या सान्निध्यात संगीताचे बाळकडू मिळाले. त्‍यांचे बालपण मुंबईत गेले. संगीत ऐकणे आणि गाणी गुणगुणने हा त्‍यांचा आवडीचा विषय. तसेच, गाणे ऐकताना दाद देणे हे एक जुळलेले समीकरण. पंधरा वर्षांचे असताना शिवाजी पार्क दादर, मुंबई येथे गणपती मंदिरात प्रभाकर कारेकर यांचे गायन ऐकण्यासाठी गेले असता तसेच गाणे ऐकताना दाद देत असताना रात्रीचे दीड कधी वाजले याचे भान राहिले नाही. मग स्वतः कारेकर यांनी त्‍यांच्या गाडीतून त्‍यांना घरी सोडले. लोणकर सर्व गाण्यांच्‍या कार्यक्रमास आवर्जून हजेरी लावतात, तसेच विशेष म्‍हणजे पहिल्‍या रांगेत बसून कार्यक्रमाचा आस्‍वाद घेतात आणि दाद देतात. आतापर्यंतच्‍या सगळ्या गाण्यांच्या कार्यक्रमास पहिल्‍या रांगेत बसूनच त्‍यांनी हजेरी लावली आहे. जुने, नवीन अशा सर्व प्रकारचे भावगीत, भक्तिगीत, शास्‍त्रीय संगीत, नाटयगीतांच्‍या कॅसेट्‌सचा संग्रह त्‍यांनी केला आहे. प्रसिद्ध गायक माणिक वर्मा, छोटा गंधर्व, प्रभाकर कारेकर, पंडित भीमसेन जोशी, पंडित रविशंकर, सुहासिनी मुलगांवकर, जितेंद्र अभिषेकी, सवाई गंधर्व, अब्‍दुल खान, नारायणराव व्यास, विनायक पटवर्धन, गानसम्राज्ञी लता मंगेशकर, सुधीर फडके, गजानन वाटवे, वसंतराव देशपांडे, किशोरी अमोणकर, दत्तात्रेय विष्‍णू पलुस्कर, कुमार गंधर्व, वीणा सहस्रबुद्धे, डी. के. दातार, निखिल बॅनर्जी आदींच्‍या जवळपास नऊशे ते हजार कॅसेट्‌सचा संग्रह करीत त्‍यांनी आपला छंद जोपासला आहे. तसेच गायकांची चरित्र पुस्‍तके, मासिकाचा संग्रह त्‍यांनी केला आहे. १९८० पासूनच्या ‘संगीत कलाविहार’ मासिकाचाही संग्रह त्यांच्याकडे आहे.

‘मंदारमाला’ नाटक बघितले पन्नास वेळा

‘मंदारमाला’ हे नाटक त्‍यांनी तब्‍बल पन्नास वेळा बघितले आहे. त्‍यातील ‘जय जय शंकरा, गंगाधरा’ या गाण्याचे बोल त्‍यांनी गाऊन दाखविले. मंदारमाला नाटकातील सर्व गाणे त्‍यांचे तोंडपाठ आहे. तसेच, पोस्‍टमन म्‍हणून नोकरी करताना जेवणासाठी आणलेल्‍या पैशातून कॅसेट्‌स विकत घेणे हे त्‍यांचे नित्‍याचे झाले होते. संगीताप्रति असलेली त्‍यांची लगन तसेच ते संगीताविषयी आपल्‍या आठवणी सांगताना भरभरून बोलत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Grand Tour 2026 : आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रस्त्यांचे जाळे; ९०० कोटींचा खर्च अपेक्षित

Pali News : रायगड जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल! 'या' तारखेपर्यंत दुपारऐवजी भरणार सकाळी शाळा

Vidhan parishad Exit Poll 2026: विधान परिषद निवडणूक! महायुतीची एकतर्फी सरशी? 12 पैकी किती जागा जिंकणार?

Crime: क्रूरतेचा कळस! घराबाहेर पडताच टोळक्यानं गाठलं; आधी महिलेवर सामुहिक अत्याचार, नंतर गुप्तांगामध्ये काठी, काडतूस टाकलं अन्...

Pune Fraud News : पर्यटन व्यावसायिकाकडून महिलेची दोन लाखांची फसवणूक; टूरला येणाऱ्या सदस्याचा मृत्यू झाल्याचे सांगत सहल केली रद्द

SCROLL FOR NEXT