World Ozone Day esakal
नाशिक

World Ozone Day: पर्यावरणपूरक सेवांना अग्रक्रमाची गरज; ओझोन थराचे घटते प्रमाण चिंताजनक

नैसर्गिक आपत्तीसह पावसावर होतोय परिणाम

प्रशांत बैरागी

नामपूर : जागतिक तापमानवाढीच्या समस्येने संपूर्ण जगाला ग्रासून टाकले आहे. यामुळे अवकाळी पाऊस, गारपीट, रोगट तापमान, ऋतुमानात झालेला बदल, त्वचेचे गंभीर विकार यासारख्या समस्यांची झळ थेट ग्रामीण भागातील नागरिकांना बसत आहे.

काही वर्षापासून सातत्याने भेडसावणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था खिळखिळी होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

पर्यावरणातील ओझोन वायूचा सातत्याने कमी होणारा थर हे याचे प्रमुख कारण असल्याचे वैज्ञानिकांच्या अभ्यासावरून सिध्द झाले आहे. त्यामुळे जागतिक ओझोन दिनानिमित्ताने नागरिकांनी पर्यावरणपूरक सेवांना अग्रक्रम देणे काळाची गरज बनले आहे. (World Ozone Day Prioritizing Environmental Services Depletion of ozone layer nashik)

‘Montreal Protocol : Fixing the Ozone Layer and Reducing Climate Change.’ ही यंदाच्या जागतिक ओझोन दिनाची थीम होती. जगभरातील सामान्य जनतेला पर्यावरणाच्या दृष्टीने ओझोन थराचे महत्त्व समजण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरण कार्यक्रम विभागातर्फे दरवर्षी जगभरात ओझोनदिनी विशेष कार्यक्रम घेतले जातात.

ओझोन थराचे संरक्षण, शाश्‍वत ऊर्जा, प्रदूषणावर नियंत्रण याविषयी जागृती निर्माण करण्यात येत आहे.

काही वर्षांपासून जागतिक तापमान वाढ हा मुद्दा सातत्याने जागतिक व्यासपीठावर चर्चेत आहे. वाढते औद्योगीकरण, शहरीकरण, कमी होत जाणारी जंगले, बदललेले राहणीमान हे प्रदूषणाची महत्त्वाची कारणे आहेत.

पृथ्वीभोवती असलेले नैसर्गिक ओझोनचे कवच सूर्यापासून निघणाऱ्या अतिनिल किरणांपासून सजीवांचे संरक्षण करते. या घातक वायूंच्या उत्सर्जनामुळे कमकुवत होत आहे. अतिनील किरणांमुळे निर्माण झालेल्या ग्लोबल वॉर्मिंगच्या समस्येला सारे जग तोंड देत आहे.

१९८५ मध्ये अंटार्क्‍टिकावरील ओझोनचा थर विरळ झाल्याचे तज्ज्ञांच्या लक्षात आले आणि या विषयाचे गांभीर्य जगाच्या समोर आले. याची शास्त्रीय कारणे शोधून हानिकारक वायूंचा वापर आणि उत्सर्जन थांबविण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने (युनो) १९८७ मध्ये मॉंट्रियल करार केला.

त्याद्वारे युवा पिढी व नागरिकांना ओझोनच्या थराचे महत्त्व पटण्यासाठी आणि संरक्षणात्मक उपाययोजना करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाने १६ सप्टेंबर १९८७ रोजी क्‍लोरोफ्युरो कार्बनची निर्मिती आणि वापर यावर नियंत्रण ठेवण्याचा करार केला. त्यानिमित्ताने १६ सप्टेंबर जागतिक ओझोन संरक्षण दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो.

सीएफसीचा वाढता वापर

वातावरणातील एकंदर ओझोनपैकी १० टक्के तपांबरात आहे, तर ९० टक्के स्थितांबरात आहे. त्यातही भूपृष्ठापासून १५ ते ३० किलोमीटरच्या पट्ट्यात ओझोनचे प्रमाण जास्त आहे. या पट्ट्यात हवेच्या दशलक्ष रेणूंमागे २६८ रेणू ओझोनचे असतात.

या ओझोनच्या स्तरामुळेच आपल्या सर्वांचे अतिनील किरणांपासून संरक्षण होते. पारंपरिक स्थितांबराला (ओझोन स्तर) छिद्र पडण्यास कारणीभूत असणाऱ्या सीएफसी वायूचा वापर वाढल्याने हायड्रोफ्लोरोकार्बनचा वापर होऊ लागला.

"पृथ्वीभोवती असलेल्या ओझोन थराचे संरक्षण ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. घातक वायूंच्या उत्सर्जनामुळे ओझोन थर विरळ होत आहे. त्याचा परिणाम मानवी आरोग्यासह पर्यावरण, जलसाठे, शेती, जनावरांच्या व्यवस्थापनावर होताना दिसत आहे. अतिनील बी किरणे पृथ्वीवर पोहोचली तर पूर्ण जीवसृष्टीचा विनाश होईल. मानवाने यावर वेळीच आवर घालणे गरजेचे आहे. मानवाला निसर्गाने दिलेली प्रतिकारशक्ती ओझोनअभावी कोसळू शकते. ओझोन थर विरळ होणार नाही, याची सर्वांनी दक्षता घ्यावी."

- आर. सी. पाटील, विज्ञान शिक्षक, नामपूर इंग्लिश स्कूल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: ''तुम्ही बंजारा समाजासारखे दिसत नसतानाही आरक्षण का खाल्लं?'', धनंजय मुंडेंना उद्देशून जरांगेंचं मोठं विधान

अडीच वर्षांपूर्वी विवाह, पतीसह सासरच्यांकडून छळ; पोलिसाच्या पत्नीनं तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत संपवलं जीवन, दिरानं रुग्णालयात नेलं, पण...

IND vs WI 1st Test Live: अरे आताच फिफ्टी झाली होती, कशाला घाई केली! Shubman Gill चा चुकीचा फटका अन् विंडीजला मिळाली विकेट

Crop Loss: पिकेच झाली उद्‍ध्वस्त, खत देणार कशाला? नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ७० हजार टनांहून अधिक साठा पडून

Layoff 2025: अमेरिकन कंपनीचा धक्कादायक निर्णय; 4 मिनिटांच्या कॉलमध्येच भारतीय कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलं

SCROLL FOR NEXT