नाशिक

सपकाळ महाविद्यालयात फार्मसिस्ट दिनानिमित्त स्पर्धा

CD
फोटो - NSK26H31525 नाशिक : अंजनेरी येथील सपकाळ औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात फार्मासिस्ट दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमप्रसंगी डॉ. नीलेश छल्लारे, प्राचार्य डॉ. आर. एस. बच्छाव, डॉ. एस. एस. हरक, प्रा. नीलेश चित्ते आदी. फार्मासिस्ट दिनानिमित्त सपकाळ फार्मसीमध्ये स्पर्धा सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ६ : कल्याणी चॅरिटेबल ट्रस्ट संचलित रवींद्र गंभिरराव सपकाळ औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, अंजनेरी येथे जागतिक फार्मासिस्ट दिन उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रीय सेवा योजना दिन, राष्ट्रीय औषधनिर्माण सप्ताह व आंतरराष्ट्रीय औषधनिर्माता दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा आणि जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आंतरमहाविद्यालयीन फार्मा क्विझ, पोस्टर सादरीकरण, वादविवाद, घोषवाक्य, रील मेकिंग, लिफलेट मेकिंग आणि पथनाट्य स्पर्धा घेण्यात आल्या. या वेळी प्रसिद्ध फार्मासिस्ट डॉ. नीलेश छल्लारे यांनी ‘आरोग्यपूर्ण भविष्यासाठी फार्मासिस्टला सशक्त करणे’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आरोग्य क्षेत्रातील फार्मासिस्टची बदलती भूमिका आणि वाढती जबाबदारी याबाबत त्यांनी माहिती दिली. विविध स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. सपकाळ नॉलेज हबचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक डॉ. रवींद्र सपकाळ, उपाध्यक्षा कल्याणी सपकाळ, सीईओ पराग सपकाळ आणि प्रशासकीय अधिकारी डॉ. एस. एस. हरक यांचे कार्यक्रमास मार्गदर्शन लाभले. प्राचार्य डॉ. आर. एस. बच्छाव, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि रासेयो स्वयंसेवक उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. नीलेश चित्ते यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

IND vs WI, 1st T20I: शे होप पुन्हा नडला, पण पदार्पणवीर नमन धीरने दाखवला इंगा! रुदरफोर्डच्या आक्रमणाने विंडिज १७० धावा पार

Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीच्या प्रभारीपदी चंद्रकांत पाटील; निवडणूकप्रमुखपदी राजेश पांडे

Delhi High Voltage Drama : राहुल गांधी, प्रियांका गांधी यांना पोलिसांनी घेतले ताब्यात; बळाचा वापर केल्याने दिल्लीत तणावाचे वातावरण

Car Accident : तिरुपतीहून परतणाऱ्या देगलूरच्या भाविकांच्या कारला अपघात; कृषी व्यावसायिक ठार, चार जखमी

Pune Teachers Constituency Election : शिवसेना भाजपमध्ये बंडखोरी, पुणे शिक्षक अर्ज दाखल; भाजपच्या कौस्तुभ गावडे यांच्याविरोधात शिवसेनेचे चिवटे रिंगणात

SCROLL FOR NEXT