Portrait rangoli drawn by art teacher Devidas Hire on the occasion of Shiv Jayanti in size 2.5 by 2.5 cm esakal
नाशिक

Smallest Portrait Rangoli: महाराजांची जगातील सर्वात लहान पोर्ट्रेट रांगोळी!

हर्षल गांगुर्डे

गणूर (जि. नाशिक) : छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती (Jayanti) रविवारी (ता.१८) राज्यासह संपूर्ण देश व अनेक राष्ट्रांमध्ये मोठ्या उत्साहात साजरी होत असताना महाराजांना अनोखं,

अविश्वसनीय अभिवादन केले आहे ते चांदवड (जि.नाशिक) येथील कलाशिक्षक देव हिरे यांनी. (Worlds Smallest Portrait Rangoli of Maharaja by Art teacher Dev Hire nashik news)

अवघ्या अडीच बाय अडीच सेंटिमीटरवर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची पोट्रेट रांगोळी काढत एका नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. ही रांगोळी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जगातील सर्वात लहान आकारातील लहान पोर्टेट रांगोळी असल्याचा दावा केला जात असून यामुळे कलेची तपश्चर्या सिद्ध करणारा हा नवा विक्रम ठरला आहे.

श्री. हिरे हे शिक्षण मंडळ भगूर, संचालित नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव (ता. चांदवड जि. नाशिक) शाळेत कलाशिक्षक असून आपल्या कलेच्या माध्यमातून सर्वत्र प्रसिद्ध आहे. शिवजयंती निमित्त महाराजांना काहीतरी वेगळ्या पद्धतीने अभिवादन करावे या प्रेरणेने (२.५ सें. मी × २.५ सें. मी.) आकारात ड्रॉइंग पेपर वर हातांच्या बोटांच्या साहाय्याने ५७ मिनिटात ही अनोखी शिवरायांची प्रतिमा रंगोळीमध्ये साकारली आहे.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

इतक्या लहान आकारात छत्रपती शिवाजी महाराजांची रांगोळी साकारणारे श्री. हिरे हे पहिले कलाकार आहेत. विविध पुरस्काराने सन्मानित देव हिरे या नावाने प्रसिद्ध असलेले नेहमीच विविध विषयांवर आपल्या फलक रेखाटन, रांगोळी, चित्र, स्केच या कलेतून विविध प्रयोग करत असतात. या रेकॉर्ड ब्रेक ,अद्भुत सर्वात लहान पोर्ट्रेट रांगोळी ने त्यांच्या प्रयोगात अजून एक भर घातली आहे.

"महाराजांना अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्याचा माझा मानस होता. या आधी नोंदवलेले रांगोळी प्रकारातील सर्व विक्रमांचा अभ्यास केला असता ३ सेमीच्या खाली कुणीही रांगोळी काढली नसल्याचे समोर आले आहे.

म्हणून मी हा प्रयोग करण्याचे ठरवलं. ५७ मिनिटात पूर्ण झालेल्या या कलाकृतीसाठी रांगोळीचे ३ रंग वापरले आहेत. महाराजांना केलेलं अनोखं अभिवादन बघून कलाक्षेत्रातील अनेकांच्या प्रेरणादायी प्रतिक्रिया येत आहेत." - देविदास हिरे, कलाशिक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT