नाशिक

सावाना अभिप्राय लेखन स्पर्धा

CD
फोटो : H33392 मुग्धा, प्रणाली अभिप्राय लेखन स्पर्धेच्या विजेत्या ‘सावाना’तर्फे आयोजन ; २१० विद्यार्थ्यांचा सहभाग सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २४ : सार्वजनिक वाचनालयाच्या सानेगुरुजी कथामाला बालभवनातर्फे वाचन प्रेरणा दिनानिमित्त ‘अभिप्राय लेखन’ स्पर्धा घेण्यात आली होती. मु. शं. औरंगाबादकर सभागृहात इयत्ता पाचवी ते सहावी व सातवी ते आठवी अशा दोन गटात स्पर्धा झाली. स्पर्धेत मुग्धा नागरे, प्रणाली खांडवी या विजेत्या ठरल्या. या वेळी विद्यार्थ्यांना वाचनालयातील बालविभागातील मराठी व इंग्रजी पुस्तकाचे वाटप करण्यात आले, विद्यार्थ्यांना त्यांना दिलेल्या पुस्तकातील काही भाग वाचून त्यावर दहा ते बारा ओळी अभिप्राय लिहिला. स्पर्धेत शहरातील विविध शाळेतील एकूण २१० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. अभिप्राय लेखनाचे परीक्षण विशाल टर्ले, उल्हास गायधनी, पद्माकर देशपांडे यांनी केले. याप्रसंगी कार्याध्यक्ष संजय करंजकर, ग्रंथ सचिव देवदत्त जोशी, अर्थसचिव प्रा. सोमनाथ मुठाळ, नाट्यगृह सचिव डॉ. धर्माजी बोडके उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन, प्रतिमापूजन व सानेगुरुजी यांना वंदन करण्यात आले. कार्यक्रम यशस्वितेसाठी दिलीप आहिरे, योगिनी जोशी, राधा राऊत, प्रीतम खरे, पुजा कापडणीस यांनी प्रयत्न केले. -- स्पर्धेचा निकाल गट पहिला (पाचवी ते सहावी) : मुग्धा नागरे, वैदेही मोरे, अनुश्री ढाके, उत्तेजनार्थ- ध्रुव अहिरे, अनुष्का गवळी, विराज यादव, विदिशा चंद्रात्रे, रियाना वैराळे, सृष्टी शिंपी, रुद्र शेळके. गट दुसरा (सातवी ते आठवी) : प्रणाली खांडवी, संयुक्ता बच्छाव, आरोही खरात. उत्तेजनार्थ- समर्थ वाघ, मनस्वी मतकर, फतेमा जोडीवाला, अलिजा शेख, अनुष्का महाजन, स्वराज गायधनी, अर्थ नवले. -----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market: ट्रेडिंग गुरु अवधूत साठेंला SEBIचा दणका! 546 कोटी परत करण्याचे आदेश, 67 कोटी व्याज अन् 11.5 कोटींचा दंडही भरावा लागणार

IND vs NZ 2nd T20I Live: श्रेयस अय्यरचा त्रिफळा, अक्षर पटेलचा अफलातून झेल! मिचेल सँटनरने ११ चेंडूंत ३ विकेट्स घेतल्या, Video

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात नवा खुलासा! सुरतमध्ये लपवलेले शस्त्र जप्त, 4 नवीन संशयितांना अटक

Latest Marathi News Live Update : ‘मुलांकडे माहिती आहे, पण ज्ञान नाही; शिक्षकांची जबाबदारी मोठी’ – देवेंद्र फडणवीस

Digital Arrest Scam:‘दोन तासांत दिल्लीला या’; पोलिसांच्या नावाने धमकावून ४३ लाख उकळले

SCROLL FOR NEXT