esakal
नाशिक

PSI Exam Date : पीएसआय पदासाठी रविवारी लेखी परीक्षा

सकाळ वृत्तसेवा

PSI Exam Date : महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट ब मुख्य परीक्षा २०२२ अंतर्गत पोलिस उपनिरीक्षक पदासाठी पेपर क्रमांक दोन येत्‍या रविवारी (ता. २९) नियोजित आहे. परीक्षेसंदर्भात महत्त्वाच्‍या सूचना महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे जारी करण्यात आल्‍या आहेत. (written exam for PSI post on 29 oct nashik news)

यापूर्वी महिन्‍याच्‍या पहिल्‍या आठवड्यात या संयुक्‍त परीक्षेतील पेपर क्रमांक एक घेण्यात आला होता. आता पदनिहाय मुख्य परीक्षेचे पेपर क्रमांक दोन पार पडत आहेत. नियोजित वेळापत्रकानुसार पोलिस उपनिरीक्षक पदासाठी रविवारी (ता. २९) पेपर क्रमांक दोन राज्‍यभरातील परीक्षा केंद्रांवर घेतली जाणार आहे.

परीक्षार्थींनी प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य असल्‍याचे आयोगाने जारी केलेल्‍या सूचनांमध्ये स्‍पष्ट केले आहे.

परीक्षा सुरू होण्याच्‍या वेळेपूर्वी दीड तास आधी परीक्षार्थीनी उपस्थित राहावे.

ओळखीच्या पुराव्‍यासाठी मूळ ओळखपत्र तसेच उमेदवाराचे छायाचित्र व इतर मजकूर सुस्‍पष्ट दिसेल, अशी मूळ ओळखपत्राची छायांकित प्रत आणणे अनिवार्य आहे. परीक्षा कक्षात मोबाईल, दूरध्वनी, इतर कोणतेही दूरसंचार साधन घेऊन जाण्यास परवानगी नाही, असेही सूचनापत्रकात नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain Update: पहाटेपासूनच मुंबईत पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात; रस्त्यांना तलावाचे स्वरूप, पाच दुर्घटनांनी वाढवली चिंता!

'धुरंधर'नंतर रणवीरची नवी खेळी! यावेळी शत्रू माणसं नाहीत, तर..., 300 कोटींच्या सिनेमाची जोरदार चर्चा

Ayodhya Temple Theft : अयोध्या मंदिर दानचोरी! महाकुंभ काळात सर्वाधिक अपहार, मेहुण्यांनी लाटले कोट्यवधी; मालमत्ता खरेदी

Gold Bra Viral Photo : असावा एखादा छंद! महिला खासदाराच्या घरात ५ कोटी कॅश, २७ किलो सोन्याचे ब्रा, अंडरवियर सापडले?; पोलिसांनी धाड टाकली अन्

Pune Crime : ‘एपीआय’ला मारहाण केल्याप्रकरणी पोलिस हवालदार निलंबित

SCROLL FOR NEXT