फोटो : H33728
--------------
‘यशस्विनी’ सन्मान सोहळा उत्साहात
बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजन
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २८ : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख कै. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवसेना (उबाठा) पक्षाच्या महिला आघाडीतर्फे यशस्विनी सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करून त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यात आला.
प. सा. नाट्यगृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे जिल्हा संपर्क नेते रवींद्र मिर्लेकर, उपनेते दत्ता गायकवाड, उपनेत्या डॉ. ज्योती ठाकरे, उत्तर महाराष्ट्र समन्वयक रंजना नेवाळकर, नाशिक लोकसभा संपर्कप्रमुख रीटा वाघ, नगरसेविका प्रज्ञा सपकाळ, उल्का विश्वासराव, दिंडोरी लोकसभा प्रमुख जयंत दिंडे, जिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, महानगरप्रमुख प्रथमेश गिते, जिल्हा सचिव नीलेश साळुंखे, जिल्हा संघटक ऋषी वर्मा, विशेष निमंत्रित बाळासाहेब कोकणे, उपजिल्हाप्रमुख सचिन बांडे, सुनील जाधव, विधानसभा प्रमुख मयूर परदेशी आदी उपस्थित होते. यावेळी भीमाताई जोंधळे (‘आजीचं पुस्तकांचं हॉटेल’), संगीता वाकळे (बचतगट सीआरपी) आणि डॉ. मीनाक्षी गवळी (क्रीडा संचालिका) यांना ‘यशस्विनी सन्मान’ प्रदान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. महिलांच्या सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा आणि विविध क्षेत्रांतील योगदानाला प्रोत्साहन देणे, त्यांच्या कर्तृत्वाला व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि समाजासमोर त्यांच्या कार्याचा आदर्श ठेवणे हा या सन्मान सोहळ्याचा प्रमुख उद्देश असल्याचे याप्रसंगी मिर्लेकर म्हणाले. नगरसेवक वैशाली दळवी, माधुरी डेमसे, महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका स्वाती पाटील आणि कीर्ती जवखेडकर, शोभा दिवे, शोभा दोंदे, शोभा वालेड, शोभा पवार, किरण चव्हाण, किमया बागुल, रंजना थोरवे, वैशाली देवरे, शारदा सकपाळ, मोहिनी राव आदी उपस्थित होते.
---------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.