Board of Trustees present at the meeting held on Tuesday at Shree Matoba Maharaj Mandir. esakal
नाशिक

Matoba Maharaj Yatrotsav : मतोबा महाराजांचा यात्रोत्सवास 25 पासून; 15 दिवस सुरू राहणार

येथील ग्रामस्थांचे दैवत व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान श्री मतोबा महाराजांचा यात्रोत्सव २५ जानेवारीपासून सुरू होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Matoba Maharaj Yatrotsav : येथील ग्रामस्थांचे दैवत व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान श्री मतोबा महाराजांचा यात्रोत्सव २५ जानेवारीपासून सुरू होणार आहे.

यात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी केदू बोरगुडे, संतोष ओस्तवाल, डॉ. गंगाधर बोरगुडे, साहेबराव काश्मीरे, प्रकाश रकिबे यांच्या हस्ते सपत्नीक मतोबा महाराजांची मतोबा महाराजांची महापूजा, तर (कै.) डॉ. वसंतराव पवार यांच्या कुटुंबीयांच्या हस्ते रथपूजा होईल, अशी माहिती देवस्थान ट्रस्टने दिली. यात्रोत्सव ९ फेब्रुवारीपर्यंत १५ दिवस अखंड सुरू राहणार आहे. (yatrotsav of Matoba Maharaj from 25 in naitale for 15 days nashik news )

यात्रोत्सवाच्या नियोजनासाठी विश्वस्त मंडळाची बैठक मंदिरात सायंकाळी झाली. श्री मतोबा महाराज देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष नामदेव बोरगुडे अध्यक्षस्थानी होते. मंदिर व परिसरातील केर-कचरा व स्वच्छतेबाबत चर्चा झाली.

भक्तनिवासाचे काम ठेकेदाराकडून तातडीने पूर्ण करून घ्यावे. महामार्ग ते मंदिरदरम्यान खांबावर दिवे लावणे, फिरते शौचालय, आरतीसाठी विविध मान्यवरांना निमंत्रित करणे, देणगीदारांचा ध्वनिक्षेपकाद्वारे नामोल्लेख करणे, त्यांची विगतवारी करणे, विश्वस्त मंडळाचा नामफलक लावणे, मंदिर व परिसरात रोषणाई करणे यासह अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली.

त्याबाबत संबंधित कार्यालयांना तातडीने पत्रव्यवहार करण्याचे ठरविण्यात आले. मंदिराच्या आतील बाजूने संपूर्ण काचेचे काम पूर्ण झाले आहे. ते काम करणाऱ्या कामगारांचा ट्रस्टतर्फे सत्कार करण्यात आला.

बैठकीस उपाध्यक्ष प्रशांत ओस्तवाल, सेक्रेटरी नंदू बोरगुडे, खजिनदार केदू बोरगुडे, सहसेक्रटरी राजेंद्र बोरगुडे, विश्वस्त अण्णासाहेब बोरगुडे, भागवतराव घायाळ, विठ्ठल कोटकर, शांताराम बोरगुडे, माधव जेऊघाले, रामदास भवर, खंडू बोरगुडे, हरी बोरगुडे यांच्यासह गणेश बोरगुडे, कृष्णा कोटकर व स्वयंसेवक उपस्थित होते.

''श्री मतोबा महाराजांचा यात्रोत्सव अखंड १५ दिवस सुरू रहाणार आहे. भाविकांनी शांतता भंग होणार नाही, असे कोणतेही कृत्य करू नये. कमी वेळेत दर्शन होण्यासाठी दर्शन रांगेचे नियोजन सुरू आहे. संपूर्ण नैताळेनगरी भाविकांच्या स्वागतासाठी उत्सुक आहेत. भाविकांनी ग्रामस्थांना, मंदिर व्यावस्थापनास, व्यावसायिकाना योग्य ते सहकार्य करावे.''-नामदेव बोरगुडे, अध्यक्ष, श्री मतोबा महाराज देवस्थान ट्रस्ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT