YCMOU Convocation
YCMOU Convocation esakal
नाशिक

YCMOU Convocation : ‘मुक्‍त’ च्‍या दीक्षांत सोहळ्यात सहभागासाठी नोंदणी आवश्‍यक; जाणुन घ्या तपशील

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठाचा अठ्ठाविसावा दीक्षांत समारंभ २३ फेब्रुवारीला सकाळी साडेदहा वाजता मुख्यालयात आयोजित केला आहे.

या सोहळ्यास उपस्‍थित राहणाऱ्या स्‍नातकांना नोंदणी प्रक्रिया राबविण्याचे आवाहन विद्यापीठातर्फे केले आहे. त्‍यासाठी मंगळवार (ता. १४) पर्यंत मुदत दिलेली आहे. (YCMOU Convocation Registration required to participate in Convocation of Free nashik news)

विद्यापीठाने याबाबत सूचनापत्र जारी केले आहे. त्‍यानुसार विद्यापीठाचा अठ्ठाविसावा दीक्षांत समारंभ २३ फेब्रुवारीला होणार आहे. सोहळ्यात २०२१-२०२२ वर्षात अर्थात डिसेंबर २०२१, मे २०२२ आणि जून २०२२ या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या पदवीधरांना प्रमाणपत्र प्रदान केले जाणार आहे.

नाशिक येथील विद्यापीठ मुख्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून पदवी ग्रहण करण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना नोंदणी करायची आहे. त्‍यासाठी https://28convocation.ycmou.ac.in या लिंकवर जाऊन विद्यार्थ्यांनी उपस्थितीबाबतची माहिती ऑनलाइन पद्धतीने भरावी. ही लिंक मंगळवार (ता.१४) पर्यंत सुरू राहील.

या कालावधीतच नोंदणी करता येणार असून, नोंदणीस मुदतवाढ मिळणार नाही. ऑनलाइन नोंदणी केल्यानंतरच विद्यार्थ्यांना विद्यापीठात प्रत्यक्ष उपस्थित राहून पदवी ग्रहण करता येईल.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

नाशिक येथे दीक्षांत समारोहाच्या दिवशी सकाळी नऊला उपस्‍थित राहून पाचशे रुपये अनामत रक्कम भरून दीक्षांत शाल घ्यावी लागणार असल्‍याचेही विद्यापीठाने कळविले आहे. दीक्षांत समारोहाबाबतची सर्व माहिती समारंभापूर्वी वेळोवेळी विद्यापीठामार्फत जारी केली जाणार आहे.

‘त्या’ विद्यार्थ्यांना अभ्यासकेंद्रामार्फत प्रमाणपत्र

नोंदणी न केलेल्‍या विद्यार्थ्यांना त्यांची पदविका, पदवी प्रमाणपत्रे दीक्षांत समारंभानंतर काही कालावधीत त्यांच्या अभ्यासकेंद्रामार्फत वितरित केली जातील. त्यांना विद्यापीठात येण्याची आवश्यकता नाही.

नोंदणी न करता आलेल्या विद्यार्थ्यांना पदविका, पदवी प्रमाणपत्र दिले जाणार नाही, असे विद्यापीठातर्फे स्‍पष्ट केले आहे. पीएच.डी. या पदवीसाठी पात्र विद्यार्थ्यांनी येथे उपस्थितीबाबत माहिती नोंदविण्याची आवश्यकता नाही. त्यांची उपस्थिती ग्राह्य धरली असल्‍याचेही विद्यापीठाच्‍या सूचनापत्रात नमूद केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HSC Exam Result : बारावीचा निकाल २.१२ टक्क्यांनी वाढला; कोकण विभागाचा सर्वाधिक ९७.५१

Narendra Modi : ... तर नेहरूंनी आरक्षणच दिले नसते

Pune News : विशाल अग्रवालसह चार जणांना अटक

Azamgarh Loksabha Election : ‘सप’च्या बालेकिल्ल्यात दोन यादवांमध्ये लढाई; धर्मेंद्र यादव विरुद्ध दिनेशलाल निरहुआ

Milind Deora : उद्धव ठाकरेंमुळे काँग्रेस पक्ष सोडला

SCROLL FOR NEXT