This year the revenue of the prison department will decrease Nashik Marathi News 
नाशिक

यंदा कारागृह विभागाचा महसूल घटणार! कच्च्या मालाअभावी उत्पादने बंद

हर्षवर्धन बोऱ्हाडे

नाशिक रोड : लॉकडाउनमुळे कारागृह विभागाने कच्च्या मालाचा पुरवठा केला नाही, त्याचप्रमाणे कलाकुसर करणाऱ्या कैद्यांना रजेवर सोडण्यात आले. त्यामुळे कारखाना विभागातील उत्पादन सध्या कमी होत असून, यंदा कारागृह विभागाचा महसूल कमी होणार आहे. राज्यातील सर्वच कारागृहांत ही परिस्थिती असून, नाशिक रोड येथील मध्यवर्ती कारागृहातील विक्री केंद्र सध्या ओस पडले आहे. 

नाशिक रोड कारागृहात पैठणी तयार करणे, साबण, फिनाईल, बेकरी उत्पादन, सतरंजा, कपडे तयार करणे, कलाकुसर व लाकडी वस्तू तयार करणे असे नऊ प्रकारचे उद्योग कारखाना विभागात चालत होते. मात्र लॉकडाउनच्या दरम्यान कच्च्या मालाचा पुरवठा बंद असल्याने सध्या साबण, बेकरी, फिनाईल, कपडे व इतर कलाकुसरीचे उद्योग बंद पडले आहेत. पर्यायाने कारागृहाबाहेर मांडण्यात आलेले सरकारी वस्तू विक्री केंद्र सध्या ओस पडले आहे. ही परिस्थिती महाराष्ट्रातील ३६ कारागृह विभागातील कारखाना विभागाची आहे. 

सध्या कैदी संख्या दोन हजार २०० च्या दरम्यान आहे. त्यातील कारागृह विभागात केवळ दीडशे ते दोनशे लोक काम करीत आहेत. लॉकडाउनच्या आधी जवळपास तीन हजार कैदी संख्या होती. त्यातील आठशे लोक कारखाना विभागात वेगवेगळ्या प्रकारची कामे करीत होती. सध्या केवळ दीडशे ते दोनशे लोक कारखाना विभागात मोजक्या वस्तूनिर्मिती करीत असून, याचा फटका कारागृहाच्या महसूलला असणार आहे. पर्यायाने कैद्यांचा रोजगारही कमी झाला आहे. अनेक कैद्यांना कोरोना काळात रजेवर सोडण्यात आले आहे. त्यामुळे कलाकुसर करणारे अनेक कैदी कारागृहाबाहेर गेल्यामुळे येथील उद्योग सध्या बंद अवस्थेत आहेत. राज्यात नागपूर विभागात तीन, मुंबई विभागात दोन, पुणे विभागात तीन, औरंगाबाद विभागात तीन असे कारखाना विभाग आहेत. 

कच्च्या मालाअभावी काही उद्योग बंद असून, कैदी रजेवर गेले आहेत. त्यामुळे साबण, फिनाईल, बेकरी व इतर उद्योग बंद आहेत. वरिष्ठांच्या आदेशानुसार लवकरच हे उद्योग सुरू होतील. 
- एस. ए. गिते, कारखाना विभाग 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Grandson Property Rights India : ... तर आजोबाच्या संपत्तीत नातवाला मिळणार नाही हिस्सा, नवा नियम काय सांगतो ?

Gas Cylinder Theft : गॅस सिलिंडर चोरणारी टोळी गजाआड; साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

कमळी फेम अभिनेत्रीच्या लेकीचं थाटात पार पडलं बारसं ! नावंही आहे तितकंच सुंदर

गेमिंगच्या नादात विद्यार्थ्याने दिला जीव; ऑनलाइन गेमिंगचं व्यसन कसं ओळखायचं? पाहा सुरक्षेचे सोपे उपाय जे तुमच्या प्रियजनाचा जीव वाचवतील

Mumbai Highway : मुंबई-नाशिक प्रवास आता सुसाट! खारेगाव खाडीवरील नवीन उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला; तासनतास होणाऱ्या कोंडीतून सुटका, पुलाची वैशिष्ट्ये काय?

SCROLL FOR NEXT