नाशिक

शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी संघ नेहमीच कटिबद्ध येवले :

CD
YEO26B26986 येवला : तालुका खरेदी विक्री संघाच्या बैठकीत उपस्थित पदाधिकारी,संचालक तसेच शेतकरी. ----------- शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी संघ नेहमीच कटिबद्ध येवले : येवला तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात ----------- ​सकाळ वृत्तसेवा येवला, ता.२ : सहकार क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या येवला तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. मागील वर्षी मका खरेदीतून तालुक्यातील शेतकऱ्यांना संघाने मोठा फायदा करून दिला आहे. शेतकरी हितासाठी संघ कटिबद्ध आहे असे प्रतिपादन संघाचे अध्यक्ष भास्कर येवले यांनी केले. सभेच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष भास्कर वामन येवले तर प्रमुख उपस्थिती उपाध्यक्ष ताई दिलीप बोडके यांची होती. सुरुवातीला संस्थचे व्यवस्थापक बाबासाहेब जाधव यांनी स्वागत केले. संस्थेचा आर्थिक ताळेबंद, नफा-तोटा आणि वर्षभरातील कामकाजाचा सविस्तर अहवाल सभासदांसमोर मांडला. ​संस्थेने शेतकरी व ग्राहक यांच्या हितासाठी बजावलेल्या कामगिरीबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. अध्यक्ष येवले यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा सादर केला. सभासद, शेतकरी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सभेतील सर्व विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले. संचालक पी. के. काळे, संजय सालमुठे, मच्छिंद्र थोरात, सुनील देशमुख, परसराम गांगुर्डे, ज्ञानेश्वर बोरनारे, सुमीत थोरात, दत्तू देवरे, गंगाधर भागवत, साहेबराव दौंडे, संतोष वैद्य, माजी संचालक सुदाम सोनवणे, रंगनाथ भोरकडे, माजी अध्यक्ष दिनेश आव्हाड, रावसाहेब महाले, दत्तात्रेय वैद्य आदी उपस्थित होते. --------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

₹85 लाख CTC, पण हातात फक्त ₹3 लाख! बाकीचे पैसे कुठे जातात? कंपनीच्या वाइस प्रेसिडेंटनेच सांगितलं पगाराचं खरं गणित

IND vs PAK Final: वैभव-श्रेयस स्वस्तात परतले, पण अभिषेक-तिलकने डाव सावरला! शेवटच्या षटकांत धावांचा पाऊस; भारताची गाडी २०० पार

Asangaon-Kasara Rail Block : प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! कसारा रेल्वेमार्गावर 7 ते 18 ऑक्टोबरदरम्यान मोठा मेगाब्लॉक; आसनगाव-कसारा लोकल सेवा बंद

चेहऱ्यावर नाही, ‘या’ गोष्टींवरून ओळखा माणसाचा स्वभाव; चाणक्य नीती काय सांगते?

Latest Marathi News Live Update : विरारमध्ये उद्घाटन कार्यक्रमावेळी भाजप कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड

SCROLL FOR NEXT