नाशिक

दीड महिन्याचाच पाणीसाठा...दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर काटकसरीने वापरा..! मुख्याधिकारी आहेर : येवल्यात नागरिकांना आवाहन,अनधिकृत नळजोडण्यांवर कारवाईचा इशारा

CD
मेनशेजारी घेणे फोटो-27045 येवला : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलावातील पाणी. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणी काटकसरीने वापरा मुख्याधिकारी आहेर : नागरिकांना आवाहन, अनधिकृत नळजोडण्यांवर कारवाईचा इशारा सकाळ वृत्तसेवा येवला, ता. ७ : तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश झाल्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील उपलब्ध पाणीसाठ्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार आहेर यांनी नागरिकांना केले. सध्या शहरात तीन दिवसांआड पाणीपुरवठा होत असून, उपलब्ध साठा दीड महिना पुरेल एवढाच असल्याने नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. दैनंदिन वापरात पाण्याची बचत करावी, वाहने धुण्यासाठी पाणी वापरू नये, नळ विनाकारण सुरू ठेवू नये, तसेच नळ, पाईप अथवा घरगुती पाणीपुरवठ्याच्या साधनांमधून होणारी गळती दुरुस्त करून घ्यावी, असे आवाहन केले आहे. पाणीपुरवठा सुरू असताना आवश्यक पाणीच भरून घ्यावे आणि अनावश्यक साठा टाळावा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले. दरम्यान, शहरातील अनधिकृत नळजोडण्यांविरुद्ध खंडित करण्याची मोहीम राबविण्यत येणार आहे. तसेच गंगासागर तलावालगतच्या विहिरी व कूपनलिकेच्या जोडण्यांबाबतही लवकरच कार्यवाही करण्यात येणार आहे. अनधिकृत नळजोडण्या, साठवण तलावाच्या परिसरातील विहिरी, बोअरवेल यांच्या वीजजोडण्या खंडित करणे, शहरातील ज्या नळांना तोट्या नाहीत असे नळ जोडणी, ज्यांच्याकडे दोन नळ आहेत असे नळ जोडणी तोडली जाणार आहेत. नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, उपनगराध्यक्षा पुष्पा गायकवाड, पाणीपुरवठा सभापती चैताली शिंदे उपस्थित होत्या. ............... कोट पाणीपुरवठा टप्पा क्रमांक दोनच्या योजनेत सध्या ३० दशलक्ष घनफुट साठा आहे. पालिकेन मागील आवर्तन मिळाल्यानंतर तीन दिवसांआड पाणी पुरवठा सुरू केला आहे. त्यामुळे उपलब्ध साठा दीड महिने पुरणार आहे. - तुषार आहेर, मुख्याधिकारी ....... कोट दुष्काळी परिस्थितीमुळे सर्व नागरिकांना काळजी घ्यावी लागेल. शहराला तीन दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. आगामी आठवड्यात आढावा घेऊन पाणीसाठा कमी झाल्यास पाणीपुरवठयात बदल केला जाईल. -राजेंद्र लोणारी, नगराध्यक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramdas Athawale on Gyanesh Kumar : 'ज्ञानेश कुमार काहीही झाले तरी राजीनामा देणार नाहीत'; अभिजीत दीपकेंच्या आंदोलनावर रामदास आठवले स्पष्टच बोलले, दिला कडक इशारा

Pune News : खेळाच्या मैदानावरील अनधिकृत इमारत महापालिकेच्या बांधकाम विभागाने केली जमीनदोस्त

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक विधान परिषद निवडणुकीसाठी ४८ उमेदवार रिंगणात; ९ ऑक्टोबरला माघारीची अंतिम मुदत

Uruli Kanchan News : पोलिसांच्या कर्तव्य भावनेने मजूर दांपत्याला मिळाला आधार! खाकी वर्दीतील माणुसकी आली धावून

Ishan Kishanने मोडला विराट कोहलीचा १० वर्षे जुना विक्रम; भारतीय खेळाडूंच्या 'या' लिस्टमध्ये अव्वल

SCROLL FOR NEXT