कृपया आवश्यक
दिवाळीनिमित्त येवल्यात दोन दिवसाआड पाणीपुरवठा करावा
कुणाल दराडे यांची मागणी, पालखेडच्या आवर्तनाची मागणी
सकाळ वृत्तसेवा
येवला,ता. २६ : ऐन दिवाळी सणाच्या काळात शहरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे .वर्षभर तीन दिवसाआड पाणीपुरवठा होत असताना नगरपालिकेने अचानक पाच दिवसाआड पाणीपुरवठा केला आहे. मुळात धरणे भरली आहे. तसेच येवल्याच्या साठवण तलावातही पुरेशी पाणी आहे. त्यामुळे दिवाळी सणाच्या कालावधीत येवलेकरांना दोन दिवसाआड पाणीपुरवठा करावा तसेच टंचाई उद्भवू नये यासाठी पालखेड डाव्या कालव्याचे आवर्तन मिळावे अशी मागणी शिवसेनेचे कुणाल दराडे यांनी पत्रकार परिषदेत केली.
येवलेकरांना सातत्याने तीन किंवा चार दिवसाआड पाणी मिळत असल्याने नियमित टंचाईचा सामना करण्याची वेळ येते. यावर्षी सर्व राज्यात टंचाईची परिस्थिती भयानक आहे हे वास्तव आहे .त्यामुळे शासनाने देखील पाणी कपातीची सूचना केली आहे. मात्र येथे दिवाळीपूर्वीच पाच दिवसाआठ पाणीपुरवठा करण्याचा अचानक निर्णय घेतला. मुळात आठवड्यातून एकदा करण्याचा पाणीपुरवठा करण्याचा निर्णय का घेतला? हे न समजणारे आहे.
शहराला पालखेड डाव्या कालव्यातून पाणीपुरवठा होऊन गंगासागर तलाव तसेच टप्पा क्रमांक दोनच्या साठवण तलावात पाणी दिले जाते. या तलावात घेतलेले पाणी सुमारे दोन महिने पुरते. योग्य नियोजन केले तर दिवाळीत दोन दिवसांआड पाणीपुरवठा करून नंतर बदल करणे शक्य आहे. त्यामुळे संपूर्ण शहराचा विचार करून दिवाळी होईपर्यंत दोन दिवसांआड पाणीपुरवठा करावा अशी मागणी कुणाल दराडे यांनी केली आहे.
तसेच शहराच्या साठवण तलावासह ३८ गाव पाणीपुरवठा योजनेच्या तलावातील पाणीसाठा आटला आहे. त्यातच पालखेड कालव्यातून दरवर्षी रब्बी हंगामासाठी दोन आवर्तने दिली जातात. यावर्षी खरिप वाया गेला. त्यातच पालखेडच्या आवर्तनाच्या भरवशावर अनेक शेतकऱ्यांनी लाल कांद्याची लागवड केली आहे. यंदा कमी पाऊस आणि उन्हामुळे विहिरींचे पाणी आटू लागले असून शेतात घेतलेले पीक सोडून देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे धरणात पाणी असल्याने पालखेड डाव्या कालव्याला रब्बीसाठी एक आवर्तन देण्यात यावे, अशी मागणीही दराडे यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.