नाशिक

येवल्याला मिळणार पुढील ३० वर्षे पाणी पुरवणारी योजना..!

CD
पान-३ मेन ------------ येवल्यात पुढील ३० वर्षांची पाणीपुरवठा योजना ------------- मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज १६० कोटींच्या येसगाव पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन ------------- सकाळ वृत्तसेवा येवला, ता. २२ : शहराच्या भविष्यातील पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन अमृत २.० अभियानांतर्गत मंजूर झालेल्या १६० कोटी रुपयांच्या येसगाव पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते उद्या (ता.२३) सायंकाळी ५ वाजता महात्मा फुले नाट्यगृह येथे होणार आहे. २०५६ पर्यंतच्या लोकसंख्येचा विचार करून शहराला ही योजना पाणी पुरवणार आहे. --------------- मंत्री भुजबळ तसेच आमदार पंकज भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ आदी उपस्थित राहतील. शहराचा वाढता विस्तार, नव्याने विकसित होत असलेल्या नागरी वस्त्या आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून ही योजना मंजूर करण्यात आली आहे. या योजनेमुळे शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेत आमूलाग्र सुधारणा होण्यास मदत होणार आहे. २०५६ पर्यंतच्या लोकसंख्येचा विचार करून नियोजित करण्यात आलेल्या या प्रकल्पातून शहरातील विद्यमान तसेच नव्याने विकसित होणाऱ्या भागांना पुरेसे आणि शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे. ------------ १६-१ अशी असेल योजना योजनेअंतर्गत नगरपालिकेच्या मालकीच्या येसगाव येथील ३.५५ हेक्टर जागेत ३०० दशलक्ष लिटर क्षमतेचा आरसीसी साठवण तलाव उभारण्यात येणार आहे. गोदावरी डाव्या कालव्यातून जलवाहिनीद्वारे या तलावात पाणी आणण्यात येईल. तेथून ६०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीद्वारे पाणी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पोहोचविण्यात येणार असून शुद्धीकरणानंतर पंपिंग यंत्रणेच्या मदतीने उंच जलकुंभांमध्ये पाणी साठवून शहरात वितरित केले जाईल. योजनेत पाणी साठवण, उपसा, शुद्धीकरण, जलवाहिन्या, उंच साठवण टाक्या आणि वितरण व्यवस्थेचा समावेश आहे. जुन्या व नादुरुस्त जलवाहिन्या बदलणे, वितरण व्यवस्थेत सुधारणा करणे तसेच ४५० किलोवॅट सौरऊर्जेवर आधारित प्रकल्प उभारण्याचेही नियोजन आहे. १६-१ योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये - एकूण प्रकल्प खर्च : १६०.२५ कोटी रुपये - येसगाव साठवण तलाव :३०० दशलक्ष लिटर क्षमता - उपसा विहीर व येसगाव ते येवला पाणी दाबनलिका : १२.८२ किलोमीटर - जलशुद्धीकरण केंद्र :७ दशलक्ष लिटर क्षमतेचे - शुद्ध जलवाहिनी :४.३९ किलोमीटर - उंच साठवण टाक्या : एकूण तीन - तहसील रोड : १२.६० लाख लिटर - विंचूर रोड : ६.७० लाख लिटर - बदापूर रोड : १.९० लाख लिटर - नवीन वितरण व्यवस्था : ९७.१६ किलोमीटर - अन्य कामे : नादुरुस्त व अपुऱ्या क्षमतेच्या जलवाहिन्या बदलणे, वितरण व्यवस्थेत सुधारणा आणि सौरऊर्जेवरील प्रकल्प. - जलवाहिन्या टाकण्यासाठी खोदण्यात येणारे रस्ते पूर्ववत करणे आणि विद्यमान घरगुती नळजोडण्यांशी संबंधित आवश्यक कामे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HARRY BROOK DOUBLE CENTURY: हॅरी ब्रूकचा वनडेत ऐतिहासिक धमाका! ११४ चेंडूंत द्विशतक ठोकत शुभमन गिलचा विक्रम मोडला, इंग्लंडसाठीही रचला इतिहास

ED Raid : पुण्यासह मुंबईतील ५६७ कोटींची मालमत्ता ‘ईडी’कडून जप्त; ‘पीएसीएल’ गैरव्यवहारप्रकरणी प्रतीक कुमारसह कंपन्यांविरोधात कारवाई

Latest Marathi News Live Update : पहिल्या टी-२० सामन्यात भारताकडून न्यूझीलंड गारद

अखेर बाप- लेकीची भेट होणार! कमळीला राजनच आपले वडील असल्याचं सत्य समजणार; 'कमळी' मध्ये मोठा ट्विस्ट, कामिनी तोंडावर पडणार

Katraj Dairy Milk Rate : कात्रज डेअरीकडून दूध खरेदी दरात प्रतिलिटर एक रुपयाची वाढ

SCROLL FOR NEXT