Grand inauguration by Dada Bhuse and presence of Chinmay Udgirkar
Grand inauguration by Dada Bhuse and presence of Chinmay Udgirkar esakal
नाशिक

YIN Art Festival : ‘यिन’ कला महोत्सवाला हर्षोल्हासात सुरवात!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : येथील गंगापूर रोडवरील मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या रावसाहेब थोरात सभागृहात शुक्रवारी (ता. ११) सकाळी युवकांसाठीच्या ‘सकाळ माध्यम समूहा’च्या ‘यिन’ व्यासपीठातर्फे ‘यिन’ कला महोत्सवाला हर्षोल्हासात सुरवात झाली. पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते महोत्सवाचे शानदार उद्‍घाटन झाले.

अभिनेते चिन्मय उदगीरकर उपस्थित होते. महापालिकेचे माजी सभागृहनेते दिनकर पाटील, अपजेटचे अमोल दरेकर, केटीएचएम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड, प्राचार्य विलासराव देशमुख, अमोल दिनकर पाटील, ‘सकाळ’च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक डॉ. राहुल रनाळकर, ‘यिन’चे व्यवस्थापक श्‍यामसुंदर माडेवार उपस्थित होते. (YIN Art Festival starts with bang Nashik News)

‘सकाळ’च्या ‘यिन’ कला महोत्सवाच्या माध्यमातून चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले असून, त्यातून चांगले कलाकार तयार होतील, असा विश्‍वास श्री. भुसे यांनी व्यक्त केला. तसेच समाजाचे अनेक प्रश्‍न आहेत, हे मांडण्यासाठी तरुणाईने पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी सांगितले. प्राचार्य डॉ. गायकवाड यांनी ‘सकाळ’च्या उपक्रमाचे कौतुक करत कला महोत्सवात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना ‘मविप्र’ आणि केटीएचएम महाविद्यालयातर्फे शुभेच्छा दिल्या. महोत्सवांतर्गत विविध १५ प्रकारच्या स्पर्धांना सुरवात झाली.

त्यात एकपात्री अभिनय, काव्यवाचन, एकल गायन, स्टॅन्डअप कॉमेडी, फॅशन शो, नृत्य, फोटोग्राफी, वक्तृत्व, वादविवाद, मूक अभिनय, स्किट, क्ले वर्क, कोलाज वर्क, रॅप, व्यंग्यचित्र आदींचा समावेश आहे. स्पर्धांमधून सर्वसाधारण विजेतेपद आणि उपविजेतेपदाने गौरविण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे सादरीकरण सुरू झाले आहे. युवा ऊर्जा फाउंडेशन, अमोल दिनकर पाटील प्रस्तुत व इन असोसिएशन विथ अपजेट अलमिरा ग्रोमिंग नेटवर्क मार्केटिंग आणि मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सहकार्य महोत्सवाला लाभत आहे.

तरुणांनी ‘सकाळ’तर्फे उपलब्ध करून देण्यात आलेल्या संधीचे सोने करावे. तरुणाईचे मनोबल उंचावण्यासाठी ‘सकाळ’तर्फे विविध उपक्रम होतात. त्यामुळे आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी तरुणांनी प्रयत्न करावा, असे सांगून अमोल पाटील यांनी फाउंडेशनच्या माध्यमातून खेळाडूंना केल्या जाणाऱ्या मदतीची माहिती दिली. २०० ज्येष्ठांना मदत केली जात आहे. उज्ज्वला गॅस योजनांचा लाभ मिळवून देण्यात आला आहे. या शिवाय दरआठवड्याला नेत्रचिकित्सा शिबिर घेण्यात येते, अशी माहितीही त्यांनी दिली.

तरुणाई नाव कमावेल

‘यिन’ कला महोत्सवातील स्पर्धांमधून यश मिळवणारी तरुणाई वेगवेगळ्या क्षेत्रांत नाव कमावेल, असा विश्‍वास व्यक्त करून डॉ. रनाळकर यांनी ‘यिन’च्या माध्यमातून झालेल्या निवडणुका, शॅडो मंत्रिमंडळाची स्थापना, प्रतिसभागृहाचे आयोजन आणि त्यामध्ये अभ्यास करून होणारे विविध विषयांचे सादरीकरण या उपक्रमांची माहिती दिली. तरुणाईमध्ये यशस्वी होण्याचा ध्यास आहे, परंतु तरुणांनी आभासी जगाची आपल्यावर छाप पाडून घेण्याऐवजी व्यक्तिमत्त्व विकासासाठी आभासी जगाचा उपयोग करून घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.

व्यक्तिगत-सामाजिक-व्यावसायिक विकासाच्या उद्देशाने २०१४ मध्ये ‘यिन’ची स्थापना झाली. आता कला सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होत नव्हते म्हणून ‘यिन’तर्फे कला महोत्सव घेण्यात येत आहे. स्पर्धेच्या पहिल्याच वर्षी ९०० विद्यार्थी महोत्सवात सहभागी झाले आहेत. पुढच्या वर्षी राज्यस्तरावर महोत्सव घेण्याचा मानस आहे. तसेच राज्यभरातील १७ स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या आठ हजार विद्यार्थ्यांना यशस्वी कलावंतांशी संवाद साधण्याचा उपक्रम राबण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे श्री. माडेवार यांनी सांगितले. ‘यिन’चे विभागीय अधिकारी गणेश जगदाळे यांनी सूत्रसंचालन केले.

आज समारोप अन् पारितोषिक वितरण

‘डिजिटल करन्सी’च्या अनुषंगाने संस्थेतर्फे सुरू असलेल्या कामांची माहिती देऊन श्री. दरेकर यांनी पाच वर्षांपासून ‘यिन’च्या माध्यमातून कसे काम चालते, याविषयी सांगितले. दरम्यान, शनिवारी (ता. १२) दुपारी तीनला रावसाहेब थोरात सभागृहात महोत्सवाचा समारोप होईल. समारोपावेळी होणाऱ्या पारितोषिक वितरणासाठी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, दिनकर पाटील, अपजेटचे क्रिएटर मयंक दुडेजा, ‘मविप्र’चे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, अभिनेत्री गौरी किरण उपस्थित राहतील.

तरुणाईचा टाळ्यांचा कडकडाट

चिन्मय उदगीरकर उत्तम कलाकार, उत्तम अभिनेते आहेत. आम्हीही आहोत, मात्र वेगवेगळ्या क्षेत्रातील. आम्ही आमची कला काही महिन्यांपूर्वी दाखवून दिली. ती राज्याने पाहिली, असे पालकमंत्र्यांनी सांगताच, तरुणांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना दाद दिली.

"समर्पण भावनेतून आपल्या कर्तृत्व आणि कलेकडे पाहायला हवे. शिवाय तरुणांना ज्या कुठल्या क्षेत्रात काम करायचे, तिथं झोकून देऊन काम केले पाहिजे." - दादा भुसे, पालकमंत्री, नाशिक

"चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके नाशिककर. त्यांचा वारसा पुढे नेत प्रस्थापित होण्यासाठी सातत्यपूर्ण काम करावे लागेल. मुळातच, कलात्मकता ही आजची पिढीला मिळालेली देणगी आहे. पण आपण पंधरा सेकंदाच्या ‘रिल्स’ आणि ‘पोस्ट’मध्ये अडकून पडत आहोत. त्यामुळे लेखन थांबले आहे. कुणाच्या तरी वाक्यावर मिमिक्री सादर करणे याला खरी गुणवत्ता म्हणत नाहीत. त्यामुळे खरे काय, चांगले काय, आनंद कसा घ्यायचा, हे ओळखायला शिकावे. अशा काळात प्रा. वसंत कानेटकर, वि. वा. शिरवाडकर यांच्या भूमीत लेखन व्हावे म्हणून ‘सकाळ’तर्फे होत असलेला ‘यिन’ कला महोत्सव महत्वाचा आहे." - चिन्मय उदगीकर, अभिनेता

"विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ‘सकाळ’ने चांगले व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. ‘यिन’ कला महोत्सवाच्या स्पर्धेतून यशस्वी कलावंत तयार होतील, हे महत्त्वाचे आहे."
- दिनकर पाटील, माजी सभागृहनेते, महापालिका

"‘सकाळ माध्यम समूहा’च्या ‘यिन’ कला महोत्सवातून तरुणांना करिअरची संधी उपलब्ध होणार आहे. दोन वर्षांमध्ये कोरोनामुळे सांस्कृतिक उपक्रमांवर मर्यादा आल्या होत्या. आताच्या कला महोत्सवातून सांस्कृतिक आणि तरुणांसाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध झाले आहे, हे कौतुकास्पद आहे. अपजेट अलमिरा परिवारातर्फे तरुणांना शुभेच्छा!"- मयंक दुडेजा, क्रिएटर, अपजेट

"कला ही वरदान आहे. मात्र त्यासाठी साधना करावी लागते. मुळातच, कलागुण, ज्ञान असलेल्यांना लोक मानतात, हे ध्यानात ठेवायला हवे. तसेच ‘सकाळ’ने मानवी जीवनाच्या उत्कर्षासाठी चांगले व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे."- अपर्णा कुलकर्णी-भट, परीक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने जिंकला टॉस; गुजरातच्या प्लेइंग-11 मध्ये मोठे बदल

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

Akshaya Tritiya 2024 : कुंडलीतील पितृदोष दूर करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला करा हे उपाय, घरात नांदेल सुख-शांती 

SCROLL FOR NEXT