dr atul salinkhe 
नाशिक

YIN : 'प्रश्नांची सोडवणुकीसाठी समाजातील छोटा घटक विचारात घ्या'

तुषार महाले

नाशिक : समाजातील सर्व प्रश्नांची जान असणे आवश्यक आहे. एखादा प्रश्न जिवंत ठेवण्यासाठी त्या प्रश्नाची जाणीव असणे महत्वाचे आहे. अर्थशास्त्रात सूक्ष्माचे नियोजन केल्याशिवाय समग्राकडे जाता येत नाही त्याचपद्धतीने प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी छोटा घटक विचारात घ्यायला हवा असे प्रतिपादन राज्याचे माजी रासयो समन्वयक प्राचार्य डॉ. अतुल साळुंखे यांनी केले. यिन अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या चर्चासत्रात शॅडो केबिनेटला मागर्दर्शन केले. त्यावेळी ते बोलत होते. yin-convention Consider a small element of society to solve problems say atul salinkhe

सामागृहात प्रतिनिधित्व करताना प्रश्नांच्या मुळापर्यंत जा, एखाद्या प्रश्नाची पार्श्वभूमी समजल्याशिवाय त्या प्रश्नाची सोडवणूक करणे अशक्य आहे, असे सांगत माजी रासयो समन्वयक प्राचार्य डॉ. अतुल साळुंखे म्हणाले, की समाजातील घटकांना न्याय देताना सामाजिक प्रश्नांची उकल करणे आवश्यक आहे. प्रश्नांच्या तीव्रतेवर समाजात परिवर्तन होण्यास मदत होत असते. युवकांनी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना, एनसीसी, क्रीडा, सांस्कृतिक योगदान आदी उपक्रमांमध्ये सहभागी होणे आवश्यक आहे. समाजाच्या जाणीवेतून समाजात बदल घडतो. यावेळी पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य संजय चाकणे उपस्थित होते.

युवकांनी योजनांची सांगड घालावी

प्रत्येक जिल्ह्याच्या समस्या, अडचणी वेगळ्या आहेत. एखाद्या जिल्ह्यातील योजना यशस्वी झाल्यास दुसऱ्या जिल्ह्यात योजना पळवली जाते. रोजगाराची निर्मिती आज होत नाही, गावांचा शाश्वत विकास करायचा असल्यास युवकांची ताकद वापरायला हवी. युवकांनी योजनांची सांगड घालून सरकारच्या अनेक योजना जोडता येऊ शकतात. समाजहित महत्वाचे असून प्रश्नांचे विवेचन करण्याची ताकद असावी असे साळुंखे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवले ब्रिजवरील वाहतूक ३ तासांनी सुरू; कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांकडून बळाचा वापर, आंदोलकांमध्ये तीव्र नाराजी

Mumbai Indians Playoff Scenario: मुंबई इंडियन्सचे आव्हान संपुष्टात? आता काही केलं तरी प्ले ऑफमध्ये पोहोचणे अशक्य; हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर सवाल, CSK चं काय?

How Mumbai Indians Still Qualify for Playoff? हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली संघ नेमका कुठे कुठे चुकला? मुंबई इंडियन्सला १४ गुणांसह अव्वल चार मध्ये पोहोचता येईल का?

Dhamangaon Blaze: नागपूरमधील धामणगाव विद्यामंदिर गावात भीषण आग, ३०-४० घरे जळून खाक, लाखोंचे नुकसान

गोव्यात दारू प्यायल्यावर जास्त नशा का चढत नाही? ९९ टक्के लोकांना खरं कारण माहित नाही...

SCROLL FOR NEXT