नाशिक

योग म्हणजे केवळ व्यायाम नव्हे, निरोगी जीवनाचा मंत्र ‘आम्ही साऱ्याजणी’ उपक्रमातून महिलांचा आरोग्यजागर

CD
शहर टुडे ३ : मेन फिचर --- NSK26H32328 जळगावः ‘सकाळ’च्या ‘आम्ही साऱ्याजणी’ उपक्रमात सहभागी योग प्रशिक्षक महिला. ---- लोगो : आम्ही साऱ्या जणी योगाभ्यासाचा जागर --- शीर्षक योग म्हणजे केवळ व्यायाम नव्हे, निरोगी जीवनाचा मंत्र उपशीर्षक योगप्रशिक्षक महिलांचा आरोग्यजागर; योगातून शारीरिक स्वास्थ्य, मानसिक स्थैर्य आणि आत्मिक समाधान सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता.१४ : नवरात्रोत्सव म्हणजे स्त्रीशक्तीचा जागर. या शक्तीचे खरे सामर्थ्य केवळ शारीरिक क्षमतेत नसून मानसिक स्थैर्य, आत्मविश्वास आणि निरोगी जीवनशैलीतही दडलेले आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात घर, कुटुंब आणि नोकरीची जबाबदारी सांभाळताना महिला स्वतःच्या आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष करतात. अशा परिस्थितीत योग हा केवळ व्यायामाचा प्रकार नसून शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्वास्थ्याचा प्रभावी मार्ग असल्याची जाणीव करून देण्याचे काम जळगावातील योगप्रशिक्षक महिला करीत आहेत. ‘सकाळ’च्या ‘आम्ही साऱ्याजणी’ या उपक्रमातून त्यांनी योगाचे महत्त्व अधोरेखित केले. शरीर अन् मनाचे संतुलन डॉ. संगीता गुरव : सुरुवातीला लोकांचा योगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन म्हणजे केवळ व्यायाम, असा होता. मात्र, योगाचे सखोल ज्ञान घेतल्यानंतर त्याचे व्यापक महत्त्व लक्षात येते. पतंजलीने सांगितलेल्या अष्टांग योगाचा अभ्यास केल्यास योगाचे खरे स्वरूप समजते. सुदृढ शरीरासोबत सुदृढ मन असणेही तितकेच आवश्यक आहे. केवळ वजन कमी करणे किंवा शारीरिकदृष्ट्या सक्षम बनणे हा योगाचा उद्देश नाही. त्यासाठी नियमित सराव, संयम आणि शारीरिक व मानसिक स्थैर्य आवश्यक असते. योगाकडे सर्वांगीण आरोग्याचा मार्ग म्हणून पाहिले पाहिजे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी साथ शीतल वाडेकर : समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, या भावनेतून मी योगाच्या माध्यमातून जनजागृती करीत आहे. गेल्या बारा वर्षांपासून योगाभ्यासात स्वतःला गुंतवून घेतले आहे. पूर्वी ग्रामीण भागात दैनंदिन कामांमधून शरीराची पुरेशी हालचाल होत असे. मात्र, आधुनिक साधनांच्या वाढत्या वापरामुळे शारीरिक हालचाली कमी झाल्या आहेत. त्यामुळे योगाचे महत्त्व अधिक वाढले आहे. महिला म्हणजे शक्तीचे रूप. घर आणि कुटुंब सांभाळताना त्यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. अशा वेळी योगामुळे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य जपण्यास मदत होते. बदलत्या जीवनशैलीत योगाची गरज सपना पाटील : योग हा केवळ शारीरिक व्यायाम नसून शरीराचे आणि मनाचे स्वास्थ्य राखण्याचा मार्ग आहे. सुमारे दहा वर्षांपूर्वी योगाभ्यासाला सुरुवात केली. त्यानंतर स्वतःमध्ये अनेक सकारात्मक बदल जाणवले. आता महिलांमध्ये योगाविषयी माहिती देऊन जनजागृती करण्याचा प्रयत्न करीत आहे. घरातील सततची कामे, जबाबदाऱ्या आणि ताणतणाव यांतून स्वतःसाठी वेळ काढणे महत्त्वाचे आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे नियमित योगाभ्यास आणि प्राणायामाला दैनंदिन जीवनात स्थान दिले पाहिजे. योगातून आत्मिक समाधान स्नेहांकित पाटील : योग म्हणजे आत्मा आणि ईश्वर यांच्यातील जोडणारा मार्ग, अशी माझी धारणा आहे. योगाचे महत्त्व लक्षात आल्यानंतर नोकरी सोडून आता पूर्णवेळ योगवर्ग घेण्याचा निर्णय घेतला. समाजात योगाविषयी जनजागृती करणे आणि लोकांना आरोग्य जपण्यासाठी प्रोत्साहित करणे, हा यामागील मुख्य उद्देश आहे. केवळ आजार झाल्यानंतर उपचार घेण्यापेक्षा आरोग्य चांगले राहण्यासाठी आधीपासूनच प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. योगाचा अभ्यास आवश्यक रजनी जाधव : सुरुवातीला योगाकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन वेगळा होता. योगाचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेता येते, त्यासाठी पदवी अभ्यासक्रमही असतो, याची माहिती मिळाल्यानंतर या विषयाचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. त्यातून योगाचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक महत्त्व लक्षात आले. योगामुळे आरोग्य आणि जीवनशैली सुधारण्यास मदत होऊ शकते. अनुलोम-विलोम, प्राणायाम आणि योग्य योगाभ्यास नियमित केल्यास आरोग्य जपण्यासाठी हातभार लागतो. मात्र, योगाचे पूर्ण फायदे मिळविण्यासाठी त्याचा योग्य अभ्यास आणि नियमित सराव आवश्यक आहे. स्वतःसाठी अर्धा तास द्या कीर्ती काटे : टीव्ही किंवा सोशल मीडियावर योगाची आसने पाहून ती लगेच करणे पुरेसे नाही. योग प्रत्यक्ष शिकून, योग्य माहिती घेऊन आणि मार्गदर्शनाखाली करणे आवश्यक आहे. प्रत्येकाने स्वतःच्या आरोग्यासाठी दररोज किमान अर्धा तास वेळ काढावा. आजार झाल्यानंतर उपचार घेण्यापेक्षा आजार टाळण्यासाठी आधीपासून काळजी घेणे अधिक चांगले. आजच्या पिढीमध्ये शारीरिक हालचाली कमी होत असून बैठ्या जीवनशैलीचा प्रभाव वाढत आहे. अशा परिस्थितीत योगामुळे शारीरिक आणि मानसिक संतुलन राखण्यास मदत होते. स्वतःच्या आरोग्यासाठी वेळ देणे ही सर्वांत चांगली गुंतवणूक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: बेशुद्ध लेकीला खांद्यावर घेऊन बाप पायीच निघाला; रुग्णवाहिकेतून उतरवलं, डॉक्टर म्हणाले, पोरं कशाला पैदा केले...

Nagpur News : डॉ. मयुरी येवले यांना मँचेस्टर विद्यापीठाची फेलोशिप; आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमासाठी निवड

Maharashtra Live News : राहुल गांधींच्या याचिकेतील तांत्रिक त्रुटी दूर; मुख्य निवडणूक आयुक्त आणि SIR विरोधात सुनावणी निश्चित

Dhirubhai Ambani: भारताला केवळ बचत नव्हे, तर गुंतवणुकीतून मालकी हक्क मिळवायला शिकवणारे गुजराती उद्योजक

अरबी समुद्राचं सुंदर दृश्य, दुर्मिळ चित्रांचा खजिना; 53 व्या मजल्यावरील माधुरी दीक्षितचं आलिशान घर पाहिलंत का?

SCROLL FOR NEXT