Bike-Accident1.jpg 
नाशिक

घरी जायची 'त्याला' ओढ...पण, रस्त्यात मृत्यू उभा ठाकलेला....

सकाळवृत्तसेवा

नाशिक : (नाशिकरोड) भरधाव वेगाने येणाऱ्या दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने दुचाकीचालक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. त्याच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. वेग आटोक्यात न आल्याने ही घटना घडल्याचे समजते.

अशी घडली घटना

प्रियकेश कैलास सोनवणे (वय २२, रा. आशीर्वाद बंगला, सुवर्णनगर, जेलरोड) असे या अपघातातील जखमी दुचाकीचालकाचे नाव आहे. प्रियकेशने नाशिकरोड पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार तो स्वत:च्या दुचाकीवरून (एमएच १५ जीडी ८४३६) सोमवारी (ता.9) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास जेलरोडच्या शनी मंदिर चौकाकडून घराच्या दिशेने जात असताना, आढाव चौकातील दिनेश फ्लोअर मिलजवळ समोरून भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीची (एमएच १५ बीएस ३२९३) समोरून धडक झाली. या धडकेत दोन्ही दुचाकीचालक रस्त्यावर पडले. या अपघातात डोक्याला मार लागल्याने गंभीर जखमी झालेल्या प्रियकेश सोनवणे यास त्याचा मित्र रोहित शेंबडे याने तत्काळ बिटको रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. 

त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यास सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. वेग आटोक्यात न आल्याने ही घटना घडली. अपघाताच्या अशाप्रकारच्या घटनांमध्ये वाढ होत असून वाहन चालवतांना काळजी घेणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Heavy Rain Alert : मॉन्सून पुन्हा सक्रिय होणार ! महाराष्ट्रासह १७ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

Tamil Nadu Politics: तमिळनाडूत मोठ्या राजकीय घडामोडींची चर्चा; अण्णा द्रमुकचे १० आमदार ‘टीव्हीके’च्या संपर्कात, १५ ऑगस्टपूर्वी पक्षांतराची शक्यता

Latest Marathi News Live Update : थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये भीषण दुर्घटना; पबला लागलेल्या आगीत 27 जणांचा होरपळून मृत्यू, अनेकजण जखमी

Police Constable Death : चंदगड पोलिस ठाण्यात खळबळ! ड्युटी संपवून घरी परतलेल्या 32 वर्षीय तरुण पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू; 3 वर्षांची चिमुरडी पोरकी

Akola: बोगस बियाणे प्रकरणी कंपन्यांना दणका; दोन कंपन्यांवर गुन्हे दाखल; कृषी विभागाची कारवाई

SCROLL FOR NEXT