दोघांकडून तरुणावर
लाठ्याकाठ्यांनी हल्ला
चिमुरडीला धक्का लागल्याचा वाद
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ६ : डॉक्टरांच्या दवाखान्यात लहान मुलीला धक्का लागल्याच्या कारणावरून एका तरुणावर लोखंडी रॉड आणि दांड्याने हल्ला करण्यात आला. पिंप्राळ्यात घडलेल्या या घटनेत जखमीच्या तक्रारीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात दोन संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंप्राळा (खंडेराव नगर) येथील रहिवासी तवक्कल उर्फ सोनू युसूफ पिंजारी (वय १८) यांची शनिवारी (ता.३) प्रकृती खालावल्याने ते मित्र शोएब सोबत खंडेराव नगरमधील पटेल डॉक्टरांच्या दवाखान्यात उपचारासाठी गेले होते. तेथे डॉक्टरांनी ‘अर्धा तास थांबावे लागेल, नाहीतर नंतर या’ असे सांगितल्याने तवक्कल आणि डॉक्टरांमध्ये बाचाबाची झाली.
वादातून हल्ला
याच वेळी तेथे उपस्थित डॉक्टर शकूर पिंजारी यांच्या नातेवाईक लहान मुलीला नकळत धक्का लागला. या कारणावरून सोनू शंकर पिंजारी आणि शोयेब पिंजारी (दोघे रा. आझाद नगर, पिंप्राळा, जळगाव) यांनी आझादनगर कब्रस्थानाजवळ तवक्कल याला गाठले. संशयितांनी त्याला शिवीगाळ करत लोखंडी रॉड आणि दांड्याने मारहाण केली. या हल्ल्यात तवक्कल याच्या डाव्या हाताला आणि दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली आहे.
याप्रकरणी जखमी तवक्कल पिंजारी याच्या तक्रारीवरून सोमवारी (ता.५) मध्यरात्री रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस नाईक रेवानंद साळुंके तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.