Death News esakal
नाशिक

Nashik News : विल्होळी येथे आढळून आलेला मृतदेह डॉक्टरचा असुन, हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यु : शवविच्छेदनातून स्पष्ट

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : राजीवनगर परिसरात वयोवृद्ध आईसमवेत राहणाऱ्या डॉक्टरचा मृतदेह संशयास्पदरित्या मुंबई-आग्रा महामार्गावरील विल्होळी येथे महामार्गालगत सोमवारी (ता. २३) सकाळी आढळून आला.

मात्र, शवविच्छेदनातून त्यांचा मृत्यु हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाल्याचे निष्पन्न झाले आहे. परंतु, ते राजीवनगरपासून इतक्या दूर अंतरावर का व कशासाठी गेले याचे कोडे पोलिसांना पडले आहे. याप्रकरणी नाशिक तालुका पोलीसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.(Young man body was found suspiciously in Vilholi Nashik Crime News)

मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

राजेश पांडुरंग जोशी (५५, रा. मनिषा बंगला, स्टेट बँक कॉलनी, राजीवनगर, इंदिरानगर) असे मयत डॉक्टरांचे नाव आहे. जोशी यांनी वकिलीचीही पदवी मिळविलेली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता. २३) सकाळी साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गावरील विल्होळी येथील महामार्ग पोलिस केंद्रापासून काही अंतरावर असलेल्या एका खड्ड्यात डॉ. जोशी हे संशयास्पदरित्या मृतावस्थेत आढळून आले होते.

घटनेची माहिती मिळताच, नाशिक तालुका पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक सारिका आहिरराव व त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाचा जागेवर पंचनामा करण्यात येऊन, मृतदेह शवविच्‌छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.

घटनेची माहिती मिळताच, तालुका पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव व पथक घटनास्थळी दाखल झाले. मयत तरुणाच्या अंगावर खरचटल्याच्या खुना आहेत.

जिल्हा रुग्णालयात डॉ. हेमंत घांगळे यांनी शवविच्छेदन केले असता डॉ. जोशी यांना मृत्यु हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाल्याचे निष्पन्न झाले. घटनास्थळी आजू-बाजूला त्यांचे वा अन्य दुसरे वाहनही आढळून आलेले नाही.

त्यामुळे ते राहत्या ठिकाणापासून इतक्या दूरवर पायी गेले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त होतो आहे. तर, हृदयविकाराचा तीव्र झटक्यामुळे ते खाली कोसळले आणि त्यामुळेच त्यांच्या चेहऱ्यावर खरचटल्याच्या जखमा आढळून आल्याचे पोलिस व शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांनी स्पष्ट केले. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

कुटूंबापासून अलिप्त

डॉ. जोशी हे गेल्या सहा-सात वर्षांपासून त्यांच्या ८० वर्षीय वयोवृद्ध आईसमवेत राजीवनगर परिसरात रहिवासाला होते. त्यांची एक मुलगी ठाण्यात डॉक्टर असून, पत्नीशी काही वर्षांपूर्वीच घरस्फोट झाला आहे. त्यांचे बंधू गिरीश जोशी हे खामगाव (जि. बुलढाणा) येथे नोकरीला आहेत. तालुका पोलिसांनी डॉ. जोशी यांच्या नातलगांशी संपर्क साधला असून, गेल्या काही वर्षांपासून डॉ. जोशी हे नातलगांपासून अलिप्तच वास्तव्याला होते, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे.

सोशल मीडियावर मात्र अफवा

दरम्यान, विल्होळी येथे डॉ. जोशी यांचा संशयास्पदरित्या मृतदेह आढळून आल्याने, त्यासंदर्भात सोशल मीडियावर खूनाचीच माहिती पसरली होती. शवविच्छेदनामुळे सदरील बाब अफवा असल्याचेच समोर आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT