death esakal
नाशिक

Nashik News : मोबाईल घेण्यास पैसे न दिल्याने तरुणाने मारली चौथ्या मजल्यावरून उडी

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सातपूर परिसरातील श्रमिकनगरमध्ये २३ वर्षीय तरुणाने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. नवीन मोबाईल घेण्यासाठी आई- वडील पैसे देत नसल्याच्या कारणातून या तरुणाने आत्महत्या केल्याचे समोर येते आहे. सदर घटना शुक्रवारी (ता. ९) पहाटे दोनच्या सुमारास घडली असून, या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

अक्षय अरुण खेताडे (23, रा. इस्पाईट हाईट्स, श्रमिकनगर, सातपूर) असे मयत तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय सध्या बेरोजगार असून, त्यास मद्याचे व्यसन होते. काही दिवसांपूर्वीच त्याचा मोबाईल हरवला होता. त्यामुळे तो सतत आई- वडिलांकडे नवीन मोबाईल घेण्यासाठी तगादा लावत होता. मात्र, त्याला मद्याचे व्यसन असल्याने पालकांनी त्याला मोबाईल घेण्यासाठी पैसे दिले नव्हते.

हेही वाचा: Credit Score :असा वाढवा तुमचा ‘क्रेडिट स्कोअर’

दरम्यान, शुक्रवारी (ता. ९) पहाटे दोनच्या सुमारास अक्षय याने घराच्या दरवाज्याची बाहेरून कडी लावून घेतली आणि चौथ्या मजल्यावर गेला व तेथून त्याने खाली उडी घेतली. सदर घटना लक्षात येताच त्याला कुटुंबाने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने अतिरक्तस्राव झाला होता. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी सातपूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC ODI World Cup 2027 India Fixture: रोहित शर्मा, विराट कोहलीचा शेवटचा वर्ल्ड कप! पण, भारताचे सामने किती वाजता सुरू होणार? कुठे Free पाहता येणार?

Pune Teamperature : ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उकाड्याचे चटके; तापमान सरासरीपेक्षा एक-दोन अंशांनी अधिक राहण्याचा अंदाज

Dapoli News : दाभोळजवळ शिकारीदरम्यान बंदुकीचा मिसफायर; एकाचा मृत्यू, एक जखमी

Pune News : पुणे महापालिका आयुक्तांचा यूटर्न; ५०० वॉर्डनच्या निविदेला स्थगिती

Ghansangavi Crime : जिरडगाव येथील हॉटेलमालकाचा खून सख्ख्या भावानेच जमिनीच्या वादातून केल्याचे निष्पन्न; आरोपी भावासह दोन जण जेरबंद

SCROLL FOR NEXT