नाशिक

भरधाव दुचाकीच्या धडकेत युवकाचा मृत्यू; दोघे गंभीर जखमी

CD
दुचाकीच्या धडकेत तरुणाचा मृत्यू; दोघे जखमी सकाळ वृत्तसेवा वणी, ता. १७ : वणी ते नांदुरी रोडवर श्रीहरी टाइल्स दुकानाजवळ दोन मोटरसायकलींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. तुषार शांताराम महाले (वय २५, रा. मार्कंड पिंप्री, ता. कळवण) असे मृत तरुणाचे नाव आहे. या अपघातात अन्य दोन जण जखमी झाले. या प्रकरणी वणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मार्कंड पिंप्री येथील रहिवासी तुषार महाले हा शेतीचे बी-बियाणे आणि औषधे घेण्यासाठी आपल्या युनिकॉर्न मोटारसायकलने (एमएच ४१ बीडब्ल्यू ३२९६) वणी येथे आला होता. काम आटोपून रात्री साडेआठच्या सुमारास तो वणीहून नांदुरीच्या दिशेने जात असताना, नांदुरी बाजूकडून भरधाव आणि चुकीच्या दिशेने (राँग साइड) येणाऱ्या स्प्लेंडर मोटारसायकल (एमएच १५ एपी ६८२५)स्वाराने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात तुषारच्या डोक्याच्या मागील बाजूस आणि तोंडाला गंभीर मार लागून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. अपघातानंतर स्थानिकांनी जखमींना तातडीने खासगी रुग्णवाहिकेतून वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी तपासून तुषारला मृत घोषित केले; तर दुसऱ्या दुचाकीवरील चालक स्वरूपाराम तारूराम (रा. कृष्णनगर, ता. फलोदी, जि. जोधपूर, राजस्थान) आणि सहप्रवासी सवाईराम राजुराम (रा. बापूनगर, जि. जोधपूर, राजस्थान) या दोन किरकोळ जखमींवर उपचार केले. या घटनेप्रकरणी मृत तरुणाचे वडील शांताराम महाले (वय ४८) यांनी वणी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. मोटारसायकलस्वार स्वरूपाराम तारूराम याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur District Bank Election news: मोहिते-पाटलांचे अर्ज बाद, धैर्यशील यांची माघार; जयकुमार गोरेंचा नवा राजकीय डाव!

Court Employee Strike : कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे जिल्हा न्यायालयाचे कामकाज ठप्प

Latest Marathi News Live Update: न्यायासाठी न्यायालयीन कर्मचारी रस्त्यावर बेमुदत संपाला सुरवात; ‘समान काम, समान वेतन’ देण्याची मागणी

Pune Crime : कॅम्प परिसरात मेफेड्रोन विक्री करणाऱ्या दोघांना अटक

IPL Retaintion: स्टार्क, दीपक चाहर, ट्रॅव्हिस हेड बाहेर... १० संघांनी कोणत्या खेळाडूंना केलं रिलीज अन् रिटेन, पाहा संपूर्ण लिस्ट

SCROLL FOR NEXT