Manoj Shinde esakal
नाशिक

Nashik News : साताळीत शेततळ्यात बुडून तरुणाचा मृत्यू

प्रमोद पाटील

येवला (जि. नाशिक) : साताळी (ता. येवला) येथील मनोज सुभाष शिंदे (वय २५) या तरुणाचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. मंगळवारी (दि.१३) दुपारी ही घटना घडली. मनोज शिंदे यांच्या शेतात उन्हाळ कांद्याची लागवड सुरू असून कांद्याला पाणी देण्यासाठी शेततळ्यातून डोंगळा पद्धतीने कांद्याला पाणी देण्यास गेला असता त्याचा तोल जाऊन शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. (young man drowned in farm pond in Satali Nashik Latest Marathi News)

हेही वाचा : इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....

वनसगाव (ता. निफाड) येथील सुभाष शिंदे हे आपल्या दोन मुलांसमवेत साताळी (ता. येवला) महालखेडा रोड या ठिकाणी शेतात राहतात. दरम्यान कांद्याची लागवड सुरू असल्याने त्यांचा धाकटा मुलगा मनोज हा कांद्याला पाणी देण्यासाठी शेततळ्यातून पाणी घेत असताना तोल गेल्याने तो तळ्यात पडला. पोहता येत नसल्याने त्याचा मृत्यू झाला. दरम्यान रात्री उशिरापर्यंत मनोजचा मृतदेह शोधण्याचे काम स्थानिक युवक तसेच चांदोरी येथील एनडीआरएफचे पथक करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोशी दुर्घटना! ६० तासानंतरही ८ जणांचा शोध नाही, नातेवाईकांचा आक्रोश; मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा, आयुक्तांनी काय सांगितलं?

उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्यासह १५ अधिकारी निलंबित; महसूल विभागात गैरप्रकार, मंत्री बावनकुळेंची माहिती

Kaygaon News : विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मुख्याध्यापकांनीच उचलला तणनाशकाचा पंप; विद्यार्थी सुरक्षा आणि आरोग्याच्या काळजीसाठी पुढाकार

Mohol News : मोहोळ येथे पंचायत समिती प्रशासन व नगरपरिषद प्रशासनात मोठा संघर्ष, नवीन नगरपरिषद इमारत बांधकामाचा पेटला वाद

Ayodhya Ram Mandir: राम मंदिर चोरीप्रकरण! काँग्रेसला अटल बिहारी वाजपेयींची आठवण; जुन्या भाषणाचा दिला दाखला

SCROLL FOR NEXT