Death News esakal
नाशिक

Nashik Accident News : छायाचित्रकार तरूणाचा ट्रकच्या धडकेने मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : सटाणा- मालेगाव रस्त्यावर अवघ्या तीन किलोमीटरवर असलेल्या आराई फाट्याजवळ ट्रकने दुचाकीस्वाराला समोरून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात ब्राह्मणगांव (ता. बागलाण) येथील तरुण छायाचित्रकाराचा जागीच मृत्यू झाला. (young photographer dies after being hit by truck nashik accident news)

या दुर्दैवी घटनेमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून, पोलिसांनी ट्रकचालकास ताब्यात घेतले आहे.

ब्राह्मणगांव येथील योगराज फोटो स्टुडिओचे संचालक रूपेश अर्जुन परदेशी (वय ३५) हे सोमवारी (ता. २२) रात्री दहाच्या सुमारास सटाणा शहरातून दैनंदिन कामे आटोपून ब्राह्मणगांवला घरी जात होते.

आराई फाट्याजवळ येताच मालेगांवकडून सटाण्याच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यामुळे रूपेश हे गंभीररीत्या जखमी होऊन रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडले. स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीने सटाणा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

या अपघाताचे वृत्त शहर व तालुक्यात पसरताच गावागावातील छायाचित्रकारांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. मंगळवारी (ता. २३) शव विच्छेदनानंतर सकाळी दहाला ब्राह्मणगांव येथे त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Warren Buffett: वॉरेन बफेंसारखी गुंतवणूक करायला शिका; कमवाल करोडो रुपये, काय आहे त्यांची स्ट्रॅटेजी?

HBD MS Dhoni: एमएस धोनीच्या नावावर असलेले असे ५ रेकॉर्ड जे मोडणं कोणालाही आहे महाकठीण

Chandrakant Patil: पुणे पोलिस दलात लवकरच एक हजार जणांना घेणार; चंद्रकांत पाटील यांची माहिती

11th Class Admission: अकरावीच्या प्रवेशासाठी आज अखेरची संधी; ३२ हजार विद्यार्थ्यांनी निश्चित केला प्रवेश

Solapur News: 'मुख्यमंत्र्यांसमवेत कल्याणशेट्टी अन्‌ मानेंची चर्चा'; माजी खासदार थांबले काही अंतरावर, नेमकं काय घडलं..

SCROLL FOR NEXT