नाशिक

Nashik Crime News: लग्नाच्या आमिषाने तरुणीचा 3 वेळा गर्भपात

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : विवाहित असूनही प्रेमसंबंध निर्माण करून विवाहाचे आमिष दाखवून तरुणीशी शारीरिक संबंध ठेवले. त्यातून तरुणी गर्भवती राहिली असता, जेवणातून गर्भपाताच्या गोळ्या दिल्या. (Young woman abort 3 times by lure of marriage nashik crime news)

अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने इंदिरानगर पोलिसांत संशयित संदीप सुधाकर दिघे (वय ३८, रा. पाथर्डी फाटा, इंदिरानगर) याच्याविरुद्ध फिर्याद दिली. त्यानुसार बलात्कार व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीनुसार, संशयित संदीप दिघे व तरुणीची २०२१ मध्ये ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्यात मैत्री होऊन प्रेमसंबंध निर्माण झाले. तरुणीला संशयिताने लग्नाचे आमिष दाखविले. पत्नीला सोडून देण्याचे सांगत त्याने तरुणीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यातून ती गर्भवती राहिली.

त्याने गर्भपाताच्या गोळ्या देत तरुणीचा गर्भपात केला. दुसऱ्यांदा पुन्हा गर्भवती राहिली असता, जेवणातून गर्भपाताच्या गोळ्या देत गर्भपात घडवून आणला. दरम्यान, तरुणीने संशयिताच्या घरच्यांना त्यांच्या सांगण्याचा प्रयत्न केला असता, दमदाटी करीत स्वतःच्या जिवाचे बरेवाईट करण्याची धमकी दिली.

त्यानंतरही तिसऱ्यांदा गर्भवती राहिली असता, तिने गर्भपात करण्यास नकार दिला. त्यावरून संशयित दिघे याने तरुणीला मारहाण करून पुन्हा गर्भपात केला. त्यानंतरही संशयिताने लग्नाबाबत टाळाटाळ केली. त्यामुळे फसगत झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने इंदिरानगर पोलिसांत धाव घेत फिर्याद दिली. त्यानुसार बलात्कारासह मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पोलिस उपनिरीक्षक मनीषा शिंदे या तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic Advisory : 'कॉक्रोच जनता पार्टी'चा आज मोर्चा! पुण्यात वाहतुकीत बदल, पर्यायी मार्ग कोणते?

Gold Rate Today: सोनं खरेदी करणाऱ्यांना अखेर दिलासा! आज सोन्याच्या भावात मोठी घसरण; 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील?

Krishnaraj Mahadik Rahul Gandhi : 'राहुल गांधींना जराही समज नाही, संसदेत आवाज उठवा, रस्त्यावर आंदोलन करून जनतेला वेठीस धरू नये'; कृष्णराज महाडिकांची टीका

Bombay High Court Alimony Ruling : पत्नीचे उत्पन्न पतीपेक्षा जास्त तर पोटगी नाही! मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतली, तरी हे आंदोलन थांबणार नाही; संजय राऊत यांचा मोदी सरकारला इशारा

SCROLL FOR NEXT