Shivjaynti
Shivjaynti esakal
नाशिक

युवकांची शिवरायांना अनोखी मानवंदना; श्रमदानातून बनवला 3 किमीचा रस्ता

दिगंबर पाटोळे

वणी (जि. नाशिक) : बोराळे (ता. चांदवड) येथील शिवरणा प्रतिष्ठानच्या सदस्यांना छत्रपती शिवाजी महारांजांच्या जयंती निमित्त बोराळे ते बोराळे फाटा असा तीन किलोमीटरचा रस्ता स्वखर्चाने व श्रमदानातून तयार करुन शिवजयंती (Shiva Jayanti) साध्यारितीने मात्र उत्साहात साजरी करत आदर्श निर्माण केला आहे.

2 तालुक्यांच्या हद्दीत अडकलेला रस्ता पुनरुज्जीवीत

दिंडोरी-चांदवड तालुक्याच्या सिमेलगत परंतु चांदवड तालुक्यात येणारे बोराळे गाव. या गावात दरवर्षी शिवरणा प्रतिष्ठानच्यावतीने शिवजंयती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यात भव्य व्यासपीठ, सवाद्य मिरवणूकीचे आयोजन केले जाते. यावर मोठा खर्चही होतो. यावर्षी मात्र प्रतिष्ठानच्या सदस्यांनी या पारंपारिक प्रथा टाळून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साध्या रितीने साजरा करण्याचा निर्णय घेवून गावासाठी काहीतरी सामाजिक उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला.

यात वणी-पिंपळगाव रस्त्याला जोडणारा बोराळे फाटा ते बोराळे हा तीन किमी अतंराच्या रस्त्याचा दीड किमी अंतर हे दिंडोरी हद्दीत तर निम्मे अंतर हे चांदवड हद्दीत असल्याने या रस्त्याकडे वर्षानुवर्षे प्रशासन व लोकप्रतिनिंधीकडून दुर्लक्षीत असल्यामुळे रस्त्याची झालेली दुरावस्था बघून आता प्रशासनाची व लोकप्रतिनींधीकडे हेलपाटे मारण्याएैवजी शिवजंयती निमित्त दरवर्षी होणारा खर्च टाळून वाचलेल्या खर्चातून व श्रमदानातून सदर रस्ता तयार करण्याचा निर्णय प्रतिष्ठानच्या सदस्यांनी घेतला. जेसीबी व ट्रक्टरच्या साह्याने रस्त्यावर मुरूम टाकून प्रतिष्ठानच्या चाळीस सदस्यांनी शिवजयंतीच्या पूर्वसंध्येस व आज सायंकाळी उशिरापर्यंत श्रमदान करुन मुरूम रस्त्यावर पसरवून रस्ता तयार केला. दरम्यान आज दुपारी प्रतिष्ठानच्या सदस्यांनी छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या प्रतिमेचे पुजन व आरती करीत मोठ्या उत्साहाने शिवजयंती साजरी केली.

युवकांनी गावापुढे निर्माण केला आदर्श

गावातील या तरुणांनी साजरी केलेल्या या अनोख्या शिवजंयती उत्सावाचे परीसरात कौतुक होत असून दरवर्षी असेच छत्रपतींच्या विचार आचाराने गाव विकासाच्या दृष्टीने समाजोपयोगी उपक्रम राबवून शिवजयंती साजरा करणार असल्याचे प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. या उपक्रमास संजय पवार यांचे प्रतिष्ठानच्या युवकांना मार्गदर्शन लाभले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT