river 
नाशिक

माझी शूटिंग काढा’ अन् क्षणातच पुलावरून तरुणाची नदीत उडी

सकाळ डिजिटल टीम

नाशिक : वेळ दुपारची...चेहेडी येथील दारणा नदीच्या पुलावर उभा भेदरलेल्या अवस्थेतील एक तरुण...कोण जाणे त्याच्या मनात काय सुरू होतं...पण तेथे उपस्थितांच्या भुवया तेव्हा उंचावल्या जेव्हा त्याने सांगितले कि....मी आत्महत्या करतोय, माझी शूटिंग काढा...(youth-attempt-suicide-video-viral-nashik-marathi-news)

‘मी आत्महत्या करतोय.. माझी शूटिंग काढा’

या घडलेल्या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवार (ता. १४) दुपारी तीनच्या सुमारास विकास विनायक लाखे (वय १९) रा. भोर मळा, सिन्नरफाटा, नाशिकरोड या तरुणाने मी आत्महत्या करतोय, माझी शूटिंग काढा’ असे सांगत एका तरुणाने दारणा नदीच्या पुलावरुन उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यावेळी नागरिकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. उडी मारण्यासाठी तरुण पुलाच्या कठड्याला धरुन बराच वेळ लटकला होता. पण उडी मारत असताना ‘माझी शूटिंग काढा’ असे तो लोकांना ओरडून सांगत होता. काही वेळाने त्याने दोन्ही हात सोडून नदीतील पाण्यात उडी मारली.

बिटको रुग्णालयात दाखल

हा प्रकार पाहणार्‍या नागरिकांनी धावत जाऊन त्याला बाहेर काढले. पोलीस पाटील सुनील गायधनी यांनी या घटनेची माहिती पोलिसांना कळविताच बिट मार्शल आणि स्थानिकांच्या मदतीने युवकाला बाहेर काढले आणि उपचारासाठी बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hong Kong fire: हाँगकाँगमधील मृतांची संख्या ९४वर; शेकडो सदनिका जळून खाक, अजूनही आग आटोक्यात नाही

फक्त सुरजच नाही, प्रेक्षकांच्या लाडक्या येसुबाईंच्याही लग्नाआधीच्या विधींना सुरुवात; थाटात पार पडला घाणा अन् बांगड्या भरण्याचा कार्यक्रम

Cyclone Dithwa : श्रीलंकेत हाहाकार माजवल्यानंतर आता 'दित्वा' चक्रीवादळाने भारताकडे वळवला मोर्चा!

Sarathi Scheme : सारथी’च्या दुर्लक्षामुळे डॉ. पंजाबराव देशमुख शिष्यवृत्ती अडचणीत; ७० हजार विद्यार्थी वंचित राहण्याची भीती!

Latest Marathi News Live Update: तपोवन वाचवण्यासाठी मोठा लढा

SCROLL FOR NEXT