beating latest crime news esakal
नाशिक

आंतरजातीय विवाह केल्याने युवकाला बेदम मारहाण

नरेश हाळणोर

नाशिक : आंतरजातीय विवाह केल्याच्या कारणावरून मुलीच्या नातलगांनी युवकाला संभाजी स्टेडिअमसमोर बेदम मारहाण करीत दमदाटी केल्याची घटना घडली.

सागर बाळासाहेब पे (२९, रा. सुतारलेन, ता. निफाड, जि. नाशिक) यांच्या फिर्यादीनुसार, सागर यांनी गेल्या ११ एप्रिल २०२१ रोजी कांचन हिच्याशी आंतरजातीय विवाह केला आहे. (Youth brutally beaten for inter caste marriage nashik crime latest marathi news)

या कारणावरून संशयित अनिल रंगनाथ कुंदे (४५), कृष्णा सदाशिव धारराव (३५), अजित विजय धारराव (२८), योगेश चंद्रकांत कर्डिले (३५), किरण बाजीराव कापसे (४०, सर्व रा. निफाड, जि. नाशिक) यांनी सागर यांना अंबड परिसरातील संभाजी स्टेडियमसमोर असलेल्या सर्व्हिस अपार्टमेंटमध्ये बेदम मारहाण केली.

तसेच, सागर व कांचन या दाम्पत्याला शिवीगाळ करीत तुझ्या घरच्यांना निफाडमध्ये कोण ठेवतो असा दमही दिला. याप्रकरणी अंबड पोलिसात संशयितांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक निरीक्षक कोल्हे हे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT