Molestation esakal
नाशिक

Nashik Crime News : पाहुणा म्हणून आलेल्या युवकाने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : मुंबई कुर्ला येथून आजीकडे पाहुणा म्हणून आलेल्या युवकाने परिसरात खेळणाऱ्या एका अल्पवयीन मुलीची छेड काढत अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.

याचा जाब विचारायला गेलेल्या मुलीच्या आईलादेखील संशयिताने जबर मारहाण केल्याची संतापजनक घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. संशयित महेश कौरी हा कुर्ला येथून नाशिकला आला होता. (youth came as guest molested minor girl Nashik Crime News)

गुरुवारी (ता. २७) रात्री घरापुढे खेळणाऱ्या एका अल्पवयीन मुलीशी या संशयिताने अंगलट करण्यास सुरवात करीत तिचा विनयभंग केला. घाबरलेल्या मुलीने घरात धाव घेत घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितला.

या वेळी आईने घराबाहेर येत संशयिताला मुलीची छेड काढल्याचा जाब विचारताच संशयिताने थेट मुलीच्या आईवर हल्ला करीत तिला जबर मारहाण केली. तसेच, संशयितांची आजी, बहीण आणि एका महिलेने येऊन मुलीच्या आईला अश्लील भाषेत शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिल्याची संतापजनक घटना घडली आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

याबाबत मुलीने आणि तिच्या आईने पंचवटी पोलिस ठाण्यात धाव घेत संशयित महेश कौरी याच्याविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार (पोक्सो) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पंचवटी पोलिस करीत आहे.

घटनेची माहिती पंचवटी पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाला मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत संशयित महेश कौरी याच्या कुटुंबीयांना विचारणा केली असता उपस्थित सर्वांनी पोलिसांशी हुज्जत घालत त्यांना उडवाउडवीची उत्तरे देत संशयिताला घटनास्थळावरून पळवून लावण्यास मदत केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT