While cutting the ribbon and inaugurating Autothon-2023' Auto Expo esakal
नाशिक

Autothon 2023 : व्रूम...व्रूम...च्या आवाजाने तरुणाई रोमांचित! ऑटोथॉन 2023 ला दमदार आणि उत्साहात सुरवात

सकाळ वृत्तसेवा

Autothon 2023 : ‘मीडिया एक्झिबिटर्स’ तर्फे आयोजित ऑटोमोबाईल क्षेत्राला खुणावणाऱ्या उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या ऑटो एक्स्पो ‘ऑटोथॉन -२०२३’ ला दमदार आणि उत्साहात सुरवात झाली. (Youth excited Autothon 2023 kicks off with bang nashik news)

सिएटचे ऑपरेशन हेड श्रीनिवास पत्की यांनी फीत कापून तसेच मान्यवरांनी दीपप्रज्वलन करून एक्स्पोचे उद्घघाटन केले. या वेळी पेरेली इंडियाचे रिजनल सेल्स मॅनेजर सुजित गायकवाड, मारुती सुझुकीचे एरिया सेल्स मॅनेजर देवेश कुमार, शिवांग आॉटोमोबाइलचे संचालक बिपिन बटाविया उपस्थित होते.

श्रीनिवास पत्की म्हणाले, की नाशिकमधील नागरिकांना मोटरस्पोर्टसची प्रचंड क्रेझ आहे. त्यासाठी मीडिया एक्झिबिटर्सने नाशिकमध्ये ‘ऑटोथॉन’ हे एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.

येथे तुम्हाला पुढील तीन दिवस ऑटो प्रदर्शन, पेंटिंग आणि व्हिंटेज कारचा अनुभव घेता येणार आहे. हे प्रदर्शन पाहण्यासाठी नाशिककरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

देवेश कुमार म्हणाले, की मीडिया एक्झिबिटर्ससोबत मारुती सुझुकीने अनेक उपक्रम राबविले आहेत. उत्तर भारतात किंवा मुंबईत एखादे प्रदर्शन आयोजित केले तर मोठा प्रतिसाद मिळत नाही. परंतु नाशिकमधील नागरिक मोठ्या उत्साहात प्रतिसाद देतात हे आम्हाला अनुभवायला मिळाले.

क्लासिक, व्हिंटेज, मॉडर्न क्लासिक कार्स यांच्यासह दुचाकी आणि चारचाकींच्या अनेक ब्रँडच्या मांदियाळीने वाहनप्रेमींच्या डोळ्याची पारणे फिटली.

एक्स्पोमध्ये सहभागी झालेल्या बाइक्सच्या व्रूम... व्रूम आवाजाने उपस्थित तरुणाई रोमांचित झाली. आयोजक संजय न्याहारकर उपस्थित होते. आयोजक साहिल न्याहारकर यांनी प्रास्ताविक तर मीडिया एक्झिबिटर्सचे संचालक नितीन मराठे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: पहिली रेल्वे 172 वर्षापूर्वी मुंबईत धावली, पहिल्या यात्रेकरुचा AI व्हिडिओ व्हायरल, 1853 मधील क्षण पाहा...

"सिंगल पालक म्हणून अधिक जबाबदारी" थोडं तुझं फेम अभिनेत्रीने आई म्हणून उलगडला प्रवास ; "मला अभिमान.."

Pune: पुण्यात नामांकित संस्थेच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांमध्ये राडा, कोयते आणि हातोड्याने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Satara News: 'कऱ्हाड आगाराला आणखी पाच नवीन बस'; एसटी कर्मचाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण; लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश

Best Airlines: फॅमिली ट्रिपसाठी फ्लाइट बुक करताय? मग आधी बघा कोणती एअरलाइन्स देते सर्वाधिक सुरक्षितता आणि आराम!

SCROLL FOR NEXT