नाशिक

युवारंगात मुळजी जेठा महाविद्यालयाची बाजी

CD
NSK26H34165 जळगाव : युवारंग-२०२६ महोत्सवातील सर्वसाधारण विजेतेपद पटकाविणाऱ्या मूळजी जेठा महाविद्यालयाच्या संघाला पारितोषिक देताना कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी व हेमंत पाटील. --- युवारंगात मूळजी जेठा महाविद्यालयाची बाजी --- सर्वसाधारण विजेतेपदावर नाव कोरले; चोपड्याचे महाविद्यालय उपविजेते सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ३१ : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे आयोजित आंतरमहाविद्यालयीन ‘युवारंग २०२६’ युवक महोत्सवात खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या मूळजी जेठा महाविद्यालयाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले, तर चोपडा येथील दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयाने उपविजेतेपद मिळविले. सिनेकलावंत व ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम हेमंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पारितोषिक वितरण झाले. कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी अध्यक्षस्थानी होते. संगीत आणि नृत्य या कला प्रकारांत मूळजी जेठा महाविद्यालयाने सर्वसाधारण विजेतेपद मिळविले. रंगमंचीय कला प्रकारात विद्यापीठ प्रशाळेने, तर ललित कलांमध्ये चोपडा येथील दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयाने बाजी मारली. महोत्सवात विविध स्पर्धांतील विजेत्यांचा गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांनी मोबाईलमध्ये रमण्याऐवजी ग्रंथालयातील पुस्तकांचे वाचन करावे, असे आवाहन हेमंत पाटील यांनी केले. सातत्य, शिस्त, वेळेचे महत्त्व, परिश्रम आणि चिकाटी ही पंचसूत्री विद्यार्थ्यांनी आत्मसात करावी, असा सल्ला कुलगुरू प्रा. माहेश्वरी यांनी दिला. दिव्यांग कला महोत्सवातील विजेत्यांचाही गौरव करण्यात आला. ‘युवास्पार्क’ स्पर्धेत कृषी, हेल्थटेक, डीप टेक आणि ओपन इनोव्हेशन क्षेत्रांतील ५३ नावीन्यपूर्ण कल्पना व प्रकल्प सादर झाले. सर्वोत्तम १५ स्पर्धकांना ‘केसीआयआयएल’तर्फे वर्षभर मोफत सहाय्य दिले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Employee: दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना भेट; तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय

Who Is Nidhi Razdan : उमर अब्दुल्लांशी लग्न करणाऱ्या निधी राजदान कोण? त्यांची संपत्ती किती?

Nilanga News : 'पीएम श्रीच्या' शाळेचे बांधकाम अर्धवट सोडून ठेकेदार 'पळाला'; दोन वर्षापासून काम रखडले, विध्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान, शाळा भाड्याच्या घरात

Sugarcane Farmers Protest Escalation : ऊस दरावरून पश्चिम महाराष्ट्र पेटला! कारखान्यांच्या दारात उभारणार छावण्या; 'या' दिवशी राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचा मोठा इशारा

Maharashtra Mega Recruitment : तरुणांसाठी मोठी लॉटरी! महसूल विभागात हजारो पदांवर होणार थेट भरती; पाहा दरमहा किती मिळणार मानधन?

SCROLL FOR NEXT