दोन बिबटे समोर आल्याने
युवकाने घेतला विहिरीचा आसरा
येवसकाळ वृत्तसेवा
येवला,ता.२५ : शेतात वीजपंप सुरू करण्यासाठी गेलेल्या युवकाच्या काळजाचा ठोका चुकविणारा प्रसंग एरंडगाव शिवारात घडला.समोर अचानक दोन बिबट्यांनी डरकाळी फोडताच मृत्यू समोर उभा ठाकल्याची जाणीव झालेल्या युवकाने क्षणाचाही विलंब न करता विहिरीत उतरून जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. तब्बल दहा मिनिटे विहिरीत जीव मुठीत धरून बसलेल्या या युवकाची थरारक कहाणी ऐकून परिसरातील शेतकऱ्यांच्या अंगावर काटा आला असून शिवारात बिबट्यांची दहशत पुन्हा ऐरणीवर आली आहे.
एरंडगाव येथील वैभव शांताराम घोरपडे हा युवक शेतात विद्युत सुरू करण्यासाठी गेला असता त्याला डोळ्यासमोर अचनाक दोन बिबटे दिसले.अचानक हा प्रसंग ओढवल्याने वैभव यांच्या पायाखालची वाळू सरकली मात्र प्रसंगावधान राखत विहिरीच्या कडेला धरून खाली उतरत विहिरीचा आसरा घेतला.
बिबटे परिसरातच असल्याच्या भीतीने त्याने काही काळ विहिरीतच काढला. दहा मिनिटांनंतर थोडा धीर आल्यावर त्याने मित्रांना दूरध्वनी करून घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर परिसरातील शेतकरी मदतीसाठी धावून आले. माणसांची चाहूल लागताच दोन्ही बिबट्यांनी तेथून पळ काढला. त्यानंतर वैभवला विहिरीबाहेर काढण्यात आले.
दोन्ही बिबटे हे छोटे पिल्ले असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे असून, त्यांची मादी बिबटही याच परिसरात असल्याची शक्यता आहे. त्यामुळे एरंडगाव शिवारातील शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने या परिसरात पाहणी करून बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.