Santosh Dhongade esakal
नाशिक

Nashik News: नदीवर बैल धुण्यासाठी गेलेल्या कुऱ्हेगावच्या युवकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यु

सकाळ वृत्तसेवा

अस्वली स्टेशन (जि. नाशिक) : इगतपुरी तालुक्यातील कुऱ्हेगाव येथील संतोष परशराम धोंगड़े वय २८ या युवकाचा आज दुपारी पाण्यात बुड़ुन दुर्दैवी मृत्यु झाला. गावाजवळून गेलेल्या उंड ओहोळ नदिवर आज दुपारी संतोष आपले बैल व घरातील गोधड्या धुण्यासाठी गेला होता. नदिवरिल रेल्वेच्या पाची पुलाजवल नदितिल पाण्याचा अंदाज न आल्याने संतोष पाण्यात बुडाला.

विशेष म्हणजे दोन तीन दिवसंपूर्वीच मुकने धरनातून नदिपात्रात पाण्याचे आवर्तन आले असल्याने नदी पूर्ण भरलेली आहे. या घटनेची माहिती गावातील नागरिकांना मिळताच त्यांनी नदिकडे धाव घेतली. येथील गणपत गुळवे यांनी नदीत उडी मारुन त्यास वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र तोही असफल ठरला. (youth of Kurhegaon who went to wash ox on river died due to drowning Nashik News)

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

अखेर गोंदे दुमाला फाटा येथील जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज संस्थेच्या मोफत रुग्नवाहिकेचे चालक निवृत्ती गुंड यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि संतोषला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले.

काही दिवसांपूर्वीच गावातील युवतीचा अपघाती मृत्यु झाला होता. त्यानंतर एक सेवानिवृत रेल्वे कामगाराचा मृत्यू झाल्याने आधीच गाव शोक मग्न अवस्थेत आहे. त्यातच आज तरुण संतोषचा पाण्यात बुड़ुन मृत्यु झाल्यामुळे कुटुंबासह गावावर शोककळा पसरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik sex scandal: खरातनंतर नवं सेक्स स्कँडल! चोरी गेलेला टॅब ठरला संकट, २०० व्हिडिओंनी उघड केलं मोठं रहस्य, तक्रारदारच अडकला

Pune Ring Road Work Accident : पुण्यात रिंग रोडच्या कामावेळी तरुणाचा बुडून मृत्यू, शिडीवर चढताना पाय घसरला अन्, ४० फूट नदीपात्रात कोसळला

Latest Marathi News Live Update : नंदुरबार शहरात वादळी वाऱ्यामुळे झाड उलमडून पडली

Ajinkya Rahane: सलग दुसऱ्या पराभवानंतर रहाणेचा टीकाकारांवर हल्लाबोल; ‘माझं यश काहींना पचत नाही, माझ्याविरोधात ठरवून अजेंडा’

'मला त्यावेळी खूप त्रास होत होता' महिनाभर अंथरुणाला खिळलेला ललित प्रभाकर, आजाराबद्दल बोलताना म्हणाला...' जो त्रास होत होता तो...'

SCROLL FOR NEXT