नाशिक

मी समाजाचा, समाज माझा’ उपक्रमातून २५ समाजबांधवांना दिवाळी फराळाचे वाटप

CD
NSK26H34802 जळगाव : दिवाळीनिमित्त समाजबांधवांना फराळवाटप करताना पदाधिकारी व युवक मंडळाचे सदस्य. शिंपी समाज युवक मंडळातर्फे फराळवाटप सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ९ : दिवाळीचा आनंद समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा, या उद्देशाने श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज हितवर्धक संस्था संचलित युवक मंडळाच्या वतीने ‘मी समाजाचा, समाज माझा’ या संकल्पनेतून समाजातील २५ गरजू समाजबांधवांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. युवक मंडळाच्या या उपक्रमामुळे समाजबांधवांच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. शहरातील हरिविठ्ठल नगर, कांचन नगर, बालाजी पेठ आणि लक्ष्मी नगर या परिसरांतील समाजबांधवांच्या घरी जाऊन दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. समाजातील प्रत्येक कुटुंबाने दिवाळीचा सण आनंदाने साजरा करावा, तसेच समाजातील परस्परांतील आपुलकी आणि बंधुभाव वृद्धिंगत व्हावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. या वेळी समाजाध्यक्ष विवेक जगताप, कार्याध्यक्ष मनोज भांडारकर, उपाध्यक्ष दिलीप सोनवणे, सचिव अनिल खैरनार आणि किरण सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती. उपक्रमाच्या यशस्वितेसाठी युवक मंडळाचे अध्यक्ष योगेश शिंपी, कार्याध्यक्ष गणेश सोनवणे, उपाध्यक्ष भूषण सोनवणे, उमेश शिंपी, सचिव निखिल सोनवणे, सतीश सोनवणे, जयेश शिंपी, गिरीश देवरे, कल्पेश खैरनार आणि योगराज शिंपी यांनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shevgaon Paithan Highway Accident: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी काळाचा घाला; कानिफनाथांच्या दर्शनाहून परतणाऱ्या दोन तरुणांचा अपघातात मृत्यू

Ambad Traffic Jam: दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी; अंबडमध्ये बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीचा बोजवारा

Yavatmal News: आदिवासी विकासमंत्री अशोक उईके थेट कोलाम पोड्यावर; गणेशवाडीत आदिम बांधवांसोबत साजरी केली दिवाळी

Maharashtra Live News: ‘दिमागी नक्षल’ वक्तव्यावरून राहुल गांधींचे मोदींना पुन्हा चर्चेचे आव्हान

Surakumar Yadav: सूर्यकुमार पुन्हा झाला कर्णधार! BCCI च्या T20 स्पर्धेत करणार मुंबईचं नेतृत्व

SCROLL FOR NEXT