धुळे : टुडे पान २ साठी....
--
अजमेरा महाविद्यालयात
युवती विकास कार्यशाळा
--
विशेष प्रशिक्षणाने विद्यार्थिनी झाल्या आत्मनिर्भर
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २७ : धुळे चॅरिटेबल सोसायटी संचलित नगाव (ता. धुळे) येथील अण्णासाहेब रमेश अजमेरा कॉलेज ऑफ फार्मसी येथे नंदी फाउंडेशनच्या ‘महिंद्रा प्राइड क्लासरूम’च्या संयुक्त विद्यमाने नुकतीच पाच दिवसीय युवती कौशल्य विकास कार्यशाळा झाली. विद्यार्थिनींचा सर्वांगीण विकास, आत्मविश्वास निर्मिती आणि त्यांना रोजगारासाठी सक्षम बनवणे हा यामागचा मुख्य उद्देश होता.
सॉफ्ट स्किल्स व सेल्स क्षेत्रातील प्रशिक्षक हकीम लकडावाला यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन केले. पाच दिवसांच्या या कार्यशाळेत २० सत्रांतून ४० तासांचे प्रशिक्षण देण्यात आले. यात व्यक्तिमत्त्व विकास, इंग्रजी संभाषण कौशल्य, देहबोली, व्यावसायिक सादरीकरण, ध्येय निश्चिती, वेळेचे व्यवस्थापन, गटचर्चा, मुलाखतीची तयारी, समस्या निराकरण, आर्थिक व्यवस्थापन, व्यावसायिक नीतिमत्ता आणि डिजिटल ओळख यांसारख्या महत्त्वाच्या विषयांचा समावेश होता. यामुळे विद्यार्थिनींना भविष्यातील रोजगाराच्या संधींसाठी स्वतःला तयार करण्याची संधी मिळाली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र डी. वाघ यांनी, अशा कार्यशाळा विद्यार्थिनींना आत्मविश्वासपूर्ण आणि रोजगाराभिमुख बनवण्यासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे मत व्यक्त केले. महाविद्यालयाचे अध्यक्ष आशिष अजमेरा, उपाध्यक्ष रोहित अजमेरा यांनी सहभागी विद्यार्थिनींचे कौतुक केले. डॉ. मीनल पाटील यांनी समन्वय केले. प्रा. विवेक पाटील यांनी सूत्रसंचालन केले. विभागप्रमुख डॉ. रवींद्र बी. पाटील, डॉ. विलास बडगुजर, डॉ. के. पी. चित्तम, डॉ. तनवीर शेख, डॉ. स्वप्निल देशमुख, डॉ. उमेश जोशी, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी संयोजन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.