crime esakal
नाशिक

Nashik Crime News : गंजमाळ भागात तरुणावर वार

गंजमाळ श्रमिकनगर भागात दोघांनी तरुणावर कोयत्याने वार करत प्राणघातक हल्ला.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : गंजमाळ श्रमिकनगर भागात दोघांनी तरुणावर कोयत्याने वार करत प्राणघातक हल्ला. हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. सोनू इस्माईल शेख (२२, रा. गंजमाळ) असे जखमीचे नाव आहे.

भद्रकाली पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. (youth was stabbed in Ganjmal area nashik crime news)

जखमी तरुण सोनू शेख शुक्रवारची नमाज पठण करून श्रमिक नगर भागातील दर्ग्यावर दर्शन घेत होता. अचानक दोघे मागून आले. त्यांनी त्याच्या मानेवर आणि हातावर कोयत्याने वार करत प्राणघातक हल्ला केला. त्यात मानेचा मागील भाग मोठ्या प्रमाणावर कापला गेला आहे.

रक्तस्राव मोठ्या प्रमाणावर होत असल्याने कुटुंबीय आणि परिसरातील नागरिकांनी त्यास उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर उपचार सुरू आहे. घडलेल्या घटनेने परिसरात तणाव निर्माण झाला आहे.

घटनेची माहिती मिळताच रहिवाशांनी घटनास्थळी गर्दी केली होती. संतप्त नागरिक आणि कुटुंबीयांनी पोलिस ठाणे आवरत मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी त्वरित कारवाई सुरू केली आहे.

दोघा संशयीतांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. मागील वादातून प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची चर्चा परिसरात सुरू होती. घडलेल्या घटनेने परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

China Nepal Border: मृत्यूचे तांडव डोळ्यांसमोर पाहतोय! प्रत्यक्षदर्शीचा अनुभव; चीन-नेपाळ सीमेवर अडकले राज्यातील ४०० भाविक

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

SCROLL FOR NEXT