Zarif Chisti Baba murder case latest news
Zarif Chisti Baba murder case latest news esakal
नाशिक

Zarif Baba Murder Case : SITकडून चौकशी; 5वा संशयित अद्यापही फरार

नरेश हाळणोर

नाशिक : निर्वासित अफगाण सुफी धर्मगुरु जरीफ बाबा यांच्या खुनप्रकरणातील आर्थिक व्यवहारांच्या चौकशीसाठी नाशिक ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षकांच्या अधिपत्याखाली विशेष चौकशी समिती (एसआयटी) स्थापन करण्यात आली आहे.

तर, खुनाच्या गुन्ह्याचा तपास येवल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान मथुरे करीत आहेत. दरम्यान, जरीफ बाबा यांचा मृतदेह दूतावासामार्फत अफगाणिस्तानला रवाना करण्यात आला आहे. (Zarif Baba Murder Case Probe by SIT 5th suspect still absconding Nashik Crime Latest Marathi News)

ख्वाजा सय्यद जरीफ अहमद चिश्ती उर्फ जरीफ बाबा (३२) या निर्वासित अफगाण सुफी धर्मगुरुंचा गेल्या ५ जुलै रोजी रात्री येवला तालुक्यातील चिंचोडी औद्योगिक वसाहतीमध्ये गोळी झाडून खून करण्यात आला होता.

याप्रकरणी नाशिक ग्रामीण पोलीसांनी गफार अहमद खान (रा. नगर), गणेश उर्फ देवा बाबासाहेब झिंजाड उर्फ पाटील (रा. लोणी, ता.राहाता, जि. अहमदनगर), रवींद्र चांगदेव तोरे (रा. शहाजापूर, कोळपेवाडी, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर), पवन पोपट आहेर (रा. विठ्ठलनगर, येवला, जि. नाशिक) या चौघांना अटक केलेली आहे.

तर, जरीफ बाबांवर गोळी झाडणारा संशयित अद्याप फरार आहे. त्याचा शोध घेण्यासाठी ग्रामीण पोलीसांचे काही पथके संशयितांच्या मागावर आहेत.

एसआयटीची नियुक्ती

जरीफ बाबा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची देणगी मिळविली होती. याच देणगीतून बाबाने कोट्यवधी रुपयांची मालमत्ता खरेदी केली होती. भारताचे नागरिकत्व नसल्याने बाबाने सदरची मालमत्ता त्यांच्या विश्‍वासातील माणसांच्या नावावर खरेदी केली होती.

यातून त्यांचा खून करण्यात आल्याचे पोलिस तपासातून निष्पन्न झाले आहे. दरम्यान, जरीफ बाबांच्या कोट्यवधीं रुपयांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यासाठी पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मनमाडचे पोलीस उपअधीक्षक समरसिंग साळवे यांच्या अधिपत्याखाली एक विशेष चौकशी समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीमार्फत आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करण्यात येत आहे.

दफनविधी अफगाणमध्ये

मयत जरीफ बाबा यांचा खून झाल्यानंतर शवविच्छेदन करून मृतदेह जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आलेला होता. अफगाणीस्तानमध्ये दफनविधी करायचा असल्याने त्यासंदर्भातील नातलगांना व्हिसा मिळविण्यात अडचणी येत होत्या.

त्यामुळे गेल्या आठवड्यात मृतदेह मुंबईकडे रवाना करून दुतावासामार्फत अफगाणीस्तानाला पाठविण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Mumbai Loksabha: वर्षा गायकवाडांना निवडणूक जाणार कठीण? या कारणामुळे नसीम खान नाराज

Goldy Brar: गोल्डी ब्रार जिवंत! कॅलिफोर्नियात मारलेली व्यक्ती दुसरीच; अमेरिकन पोलिसांचा खुलासा

Latest Marathi News Live Update : 10 नक्षलवाद्यांच्या मृतदेहांसह शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त

SCROLL FOR NEXT