‘झेड’ प्रमाणपत्राच्या आधारे जागतिक गुणवत्ता
भारतीय गुणवत्ता परिषदेचे आवाहन; गुणवत्ता, उत्पादकता आणि पर्यावरणपूरक उत्पादनावर भर
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २४ : सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांनी ‘झिरो डिफेक्ट झिरो इफेक्ट’ (झेडईडी) प्रमाणपत्राच्या आधारे गुणवत्ता सुधारल्याने नाशिकला राज्यात उच्च स्थान मिळाले आहे. उद्योजकांनी ‘झेड’ हे प्रमाणपत्र घेऊन जागतिक स्तरावरील गुणवत्ता प्राप्त करून घेण्याचे आवाहन क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आले.
नाशिक इंडस्ट्रिअल मॅन्यूफॅक्चरींग असोसिएशन (निमा)च्या कार्यालयात शुक्रवारी (ता.२३) ही परिषद पार पडली. यावेळी कॉलिटी सिटी ऑफ इंडियाचे सदस्य जितूभाई ठक्कर, उदय बर्वे, निमाचे उपाध्यक्ष मनीष रावल, किशोर राठी, सरचिटणीस राजेंद्र अहिरे, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स संजय सोनवणे उपस्थित होते.
केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या या योजनेत ब्राँझ, सिल्व्हर आणि गोल्ड असे तीन प्रमाण स्तर आहेत. उद्योगांना त्यांच्या कार्यपद्धतीनुसार गुणवत्ता, सुरक्षितता, ऊर्जा कार्यक्षमता आणि पर्यावरण व्यवस्थापनाशी संबंधित निकष पूर्ण करावे लागतात. पात्र उद्योगांना प्रमाणपत्र शुल्कावर अनुदानासह काही तांत्रिक सुधारणा व मार्गदर्शनासाठीही योजनेच्या नियमानुसार आर्थिक सहाय्य मिळू शकते.
नाशिकमधील उद्योगांनी या योजनेची माहिती घेऊन प्रमाणपत्रासाठी पुढाकार घ्यावा. गुणवत्ता सुधारणा आणि उत्पादन प्रक्रियेतील कार्यक्षमता वाढविण्याच्या माध्यमातून उद्योगांनी जागतिक बाजारपेठेतील संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
झेडईडी प्रमाणपत्राचे तीन स्तर
- ब्राँझ : गुणवत्ता आणि उत्पादन प्रक्रियेतील मूलभूत निकषांची पूर्तता.
- सिल्व्हर : गुणवत्ता व्यवस्थापन आणि कार्यपद्धतीत अधिक सुधारणा.
- गोल्ड : गुणवत्ता, सुरक्षितता आणि पर्यावरण व्यवस्थापनाच्या उच्च निकषांची पूर्तता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.