Dr. Vaishali Jhankar Sakal
नाशिक

नाशिक : लाच प्रकरणात झेडपीच्या शिक्षणाधिकारी वैशाली झनकर फरार

सकाळ डिजिटल टीम

नाशिक : जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर-वीर यांच्यासह त्यांचा ड्रायव्हर ज्ञानेश्वर येवले यांना लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (दि.10) ताब्यात घेतले होते. रात्री महिला संशयितेस अटक करण्याची पोलिसांची वेगळी पद्धत असून सूर्यास्त झाल्यानंतर महिलेस अटक न करण्याचा नियम आहे. काल संशयित वीर यांना ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतले, बुधवारी पोलिसांत हजर होण्याची हमी घेत संशयित वीर यांना घरी जाऊ दिले. आज मात्र त्या पोलिस स्टेशनमध्ये आल्याच नाहीत असे पोलिस अधिकाऱ्यानी सांगितले.

शिक्षक संस्थेच्या शाळांना मंजूर झालेल्या २० टक्के अनुदानातून नियमित वेतन करण्याचे आदेश देण्याच्या मोबदल्यात आठ लाख रुपयांची लाच शासकीय वाहन चालकाच्या माध्यामातून स्वीकारल्याच्या कारणातून नाशिक जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली वीर-झनकर यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले होते. मात्र आज त्या पोलिस स्टेशनमध्ये हजर झाल्या नाहीत. या प्रकरणात अटक केलेल्या दोघांना नाशिकच्या न्यायालयाने १३ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणात तक्रारदार यांची शिक्षण संस्था असून त्यांच्या शाळांना शासनाकडून २० टक्के अनुदान मंजूर झाले होते. या मंजूर झालेल्या अनुदानाप्रमाणे संस्थेस नियमित वेतन सुरु करण्याच्या ऑर्डरची मागणी संस्थेकडून माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडून करण्यात आली. यावेळी संस्थेकडे सुमारे ९ लाख रुपयांची लाचेची मागणी करण्यात आली. यावेळी तक्रारदार यांनी तडजोडीअंती आठ लाख रुपये देण्याचे कबूल केले.या प्रकरणातील अन्य दोन संशयित शासकीय वाहनचालक ज्ञानेश्वर येवले आणि प्राथमिक शिक्षक पंकज दशपुते या दोघांना जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आलं आहे. या दोघांना नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयानं १३ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा Ee Sala Cup Namde! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

BJP Government: भाजप सरकार देणार पाच रुपयांमध्ये मासे-भात भोजन; महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

Ambad Rajasthani Women: अंबडमध्ये राजस्थानी महिला मंडळाचा ‘धोंडा रो आगमन’ सोहळा; दीडशे लेकींचा पारंपरिक धोंडे जेवण, आहेर व भेटवस्तूंनी सन्मान

Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

SCROLL FOR NEXT