zp schools teacher Sakal
नाशिक

जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या होणार

संभ्रम दूर; शासन निर्णयामुळे प्रतीक्षेला विराम

सकाळ वृत्तसेवा

नामपूर - गेल्या चार वर्षांपासून प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या झालेल्या नाही. यंदाही जून महिना उजाडून शिक्षण/ग्रामविकास विभागाकडून कोणताही आदेश पारित होत नसल्याने शिक्षकांच्या बदल्यांबाबत शिक्षकांमध्ये संभ्रमावस्था होती. परंतु मंगळवारी (ता.७) जारी झालेल्या शासन निर्णयामुळे शिक्षकांची बदल्यांबाबतची प्रतीक्षा संपली आहे. याबाबत प्राथमिक शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत/आंतरजिल्हा बदल्यांसाठी ७ एप्रिल २०२१ च्या दोन स्वतंत्र शासन निर्णयान्वये सुधारित धोरण विहित करण्यात आले आहे. सदर धोरणातील तरतुदीनुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत/आंतरजिल्हा बदल्यांसाठी ऑनलाइन प्रणाली विकसित करण्यात आली असून सन २०२२ मधील बदल्या ऑनलाइन प्रणालीद्वारे करण्यात येणार आहेत. सदर प्रणालीमध्ये प्रत्यक्ष चालणाऱ्या कामकाजाच्या अनुषंगाने बुधवारी (ता.८) सकाळी अकरा ते एक या वेळेत राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांचे ऑनलाइन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. प्रशिक्षणास उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन विभाग) यांनाही उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बदलीस पात्र असलेल्या/विशेष संवर्ग भाग-१ मधील/विशेष संवर्ग भाग-२ मधील शिक्षकांची यादी, निव्वळ रिक्त पदांची यादी, संभाव्य रिक्त पदांची यादी, जिल्ह्यातील अवघड क्षेत्र घोषित करणे आदी बाबींचा यावेळी आढावा घेण्यात येईल.

राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांसाठी विकसित करण्यात येत असलेल्या मोबाईल ॲपचा मसुदा पूर्ण झाला आहे. हा मसुदा मोबाईल आणि संगणक (डेस्क टॉप) अशा दोन्ही ठिकाणी वापरता येणार आहे. या मसुद्यामुळे प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या आता या ॲपच्या माध्यमातून ऑनलाइन होणार आहेत. राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आणि सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा आदी प्रक्रियेचे कामकाज पाहत आहेत.

विन्सीस सॉफ्टवेअर कंपनीची नेमणूक

जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत तसेच आंतरजिल्हा ऑनलाइन बदल्यांसाठी मे. विन्सीस सॉफ्टवेअर कंपनीची नेमणूक करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीसंदर्भातील १० टक्क्यांपेक्षा जास्त जागा रिक्त असल्यास त्या जिल्हा परिषदांमधून शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीने बाहेर जाता येत नव्हते. परंतु यंदाच्या बदल्यांमध्ये मात्र अशी तरतूद वगळण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदांमध्ये रिक्त पदाची टक्केवारी १० पेक्षा जास्त असली तरी अशा सर्व जिल्हा परिषदांना, जिल्हा परिषद शिक्षकांच्या सन २०२२ मध्ये होणाऱ्या ऑनलाइन बदली प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेणे शक्य होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak : नीट पेपरफुटी प्रकरणात आणखी एक तज्ज्ञ प्राध्यापिका रडारवर; मनीषा हवालदारचे सीबीआय चौकशीत धक्कादायक खुलासे !

Beed Crime News : बीड पुन्हा हादरले! सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती; उमेश दळवीची निघृण हत्या, बेदम मारहाणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Latest Marathi News Live Update : राज्यातील काही जिल्ह्यांना आज पावसाचा इशारा

दिवाळीनंतर नाही तर दिवाळीपूर्वीच होणार रणबीर कपूरचा रामायण सिनेमा रिलीज !

Pune News: पुण्यात आज मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; उकाड्यातून दिलासा; पुणेकरांना आज पावसाची साथ; हवामान विभागाचा अंदाज

SCROLL FOR NEXT