Nashik ZP News
Nashik ZP News  esakal
नाशिक

Nashik ZP News: जि. प. लेखा विभागात पदोन्नत्यांची लॉटरी; तब्बल 30 अधिकाऱ्यांना संधी

सकाळ वृत्तसेवा

Nashik ZP News: जिल्हा परिषदेच्या लेखा व वित्त विभागातील सहाय्यक, कनिष्ठ, वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक लेखा अधिकारी यांच्या प्रथमच एकाचवेळी ३० पदोन्नत्या झाल्या आहेत.

या पदोन्नत्यांचे आदेश सोमवारी (ता. ४) मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या स्वाक्षरीने संबंधितांना देण्यात आले. पदोन्नत्या देताना सर्वांना न्याय दिला असून, तालुक्यांचा समतोल साधला असल्याचे जिल्हा लेखा व वित्त अधिकारी भालचंद्र चव्हाण यांनी सांगितले. ( zp Accounts Department 30 promotions have been done nashik news)

जिल्हा परिषदेतील लेखा व वित्त विभागातील कनिष्ठ व वरिष्ठ लेखाधिकारी तसेच वरिष्ठ व कनिष्ठ सहाय्य लेखाधिकारी यांच्या रखडलेल्या पदोन्नत्यांना मुहूर्त लागला. सहा महिन्यांपासून विभागस्तरावर ही प्रक्रिया सुरू झाली होती. जिल्हा लेखा व वित्त अधिकारी चव्हाण यांनी पदोन्नती समितीची एकदा नव्हे, तर दोनदा बैठक घेत यादी अंतिम केली.

बैठकीनंतर साधारण कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचे आदेश मिळणे अपेक्षित होते. परंतु यादी अंतिम होऊनही आदेश मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांनी ओरड केली होती. अखेर सोमवारी श्री. चव्हाण यांनी श्रीमती मित्तल यांच्याकडून अंतिम यादी व कर्मचाऱ्यांच्या आदेशावर स्वाक्षरी घेत सायंकाळी कर्मचाऱ्यांना आदेश वितरित केले.

यात ९ कनिष्ठ लेखा अधिकारी यांना सहाय्यक लेखा अधिकारी, १४ वरिष्ठ सहाय्यक लेखा अधिकाऱ्यांना कनिष्ठ लेखाधिकारीपदी, तर पाच कनिष्ठ सहाय्यक लेखाधिकाऱ्यांना वरिष्ठ सहाय्यक लेखाधिकारीपदी पदोन्नती देण्यात आली आहे.

पदस्थापना मिळालेले कर्मचारी (कंसात पदस्थापनेचे ठिकाण)

-सहाय्यक लेखाधिकारी ः जयंत चौधरी (आरोग्य विभाग, मुख्यालय), रत्नाकर सोनवणे (नाशिक पंचायत समिती), केशव खुळे (इगतपुरी पं. समिती), विजय जगदाळे (सिन्नर पं. समिती), महेंद्रसिंग सूर्यवंशी (वित्त विभाग, मुख्यालय), वर्षा पाटील (मालेगाव पं. समिती), जगन बहिरम (सुरगाणा पं. समिती), दिनकर सांगळे (बांधकाम क्र. ३, मुख्यालय), रमेश शिंदे (नांदगाव पं. समिती).

- कनिष्ठ लेखाधिकारी ः मंदाकिनी पवार (ग्रामीण पाणीपुरवठा, मुख्यालय), राजेंद्र हरिश्चंद्र (बागलाण प.. समिती), मंगेश जगताप (सिन्नर पं. समिती), कुणाल चंदेल (निफाड पं. समिती), दिलीप तडवी (मालेगाव पं. समिती), उमेश राजपूत, धनश्री पवार, किरण दराडे, (वित्त विभाग, मुख्यालय), स्मिता देवरे (इगतपुरी पं. समिती), सुभाष गायकवाड (शिक्षण विभाग, मुख्यालय), संपत ढोमसे (चांदवड पं. समिती), जगन गवळी (सुरगाणा पं. समिती), तुषार भोरस (नांदगाव पं. समिती).

- वैभवी भुजाड, दत्तात्रय कंक (वित्त विभाग मुख्यालय), रवींद्र चंद्रात्रे (आरोग्य विभाग, मुख्यालय), प्रदीप देवरे (निफाड पं. समिती), वसंत उघडे (दिंडोरी पं. समिती), सोमनाथ आढाव (सुरगाणा पं. समिती).

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT