ZP Nashik latest marathi news esakal
नाशिक

Nashik ZP News : जि. प. जलसंधारण विभागाच्या टेंडर क्लार्कचा पदभार काढला; वाढत्या तक्रारीमुळे निर्णय

सकाळ वृत्तसेवा

Nashik ZP News : जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे पूर्व व पश्चिम विभागाचे एकत्रीकरण झाले असून नव्याने तयार झालेल्या जलसंधारण विभागातील टेंडर क्लार्कच्या तक्रारी वाढल्या. वाढत्या तक्रारींवरून त्यांचा पदभार काढून घेतल्याचे समजते.

या बाबतचा प्रस्ताव प्रशासनाकडे सादर झाला आहे. तक्रारदार टेंडर क्लार्कचा पदभार हा विभागामधील कनिष्ठ सहाय्यक यांच्याकडे दिला जाण्याचा प्रस्ताव आहे. (ZP Charged as Tender Clerk of Water Conservation Department Decision due to growing complaints Nashik News)

जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाच्या पूर्व व पश्चिम या दोन विभागांऐवजी नाशिक जिल्हा परिषदेत एकच जलसंधारण अधिकारी कार्यालय तयार करण्यात आले आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने या दोन्ही विभागांचे समायोजन केले आहे.

जलसंधारण विभागाचे १५ विभाग रद्द करून केवल नऊ विभागीय कार्यालये करण्यात आली आहेत. या एकाच कार्यालयातून विभागाचे कामकाज चालते. या विभागातील निविदा प्रक्रीया राबविण्याचे काम संबंधित टेंडर क्लार्क करत होता.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

मात्र, संबंधित टेंडर क्लार्क यांच्या कामकाजाबाबत विभागाकडे लेखी तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. दिवसेंदिवस त्यांच्या तक्रारीत वाढ होत होती. वेळात निविदा न उघडणे, ठराविक कामे करणे आदींबाबतच्या तक्रारीत समावेश होता.गतवर्षी शिपायामधून काही कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली होती.

यात संबंधित कर्मचाऱ्यास देखील पदोन्नती मिळाली होती. मात्र, कामकाजात तक्रारी येत असल्याने त्यांचा पदभार काढून घेण्यात आला आहे. हा पदभार विभागामध्ये कार्यरत असलेल्या कनिष्ठ सहाय्यकांकडे सोपविण्याची शिफारस विभागाने केली आहे. त्याबाबतची फाइल देखील प्रशासनाकडे प्राप्त झाली आहे. हा पदभार काढल्याने कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kharmas 2026: 15 मार्चपासून बदलणार ग्रहस्थिती! सूर्य मीन राशीत; का करू नयेत शुभ काम?

स्टार प्रवाहचा झी मराठीला दणका! कमळी, स्वानंदीने स्थान गमावलं; टीआरपी आपटला, पहिल्या स्थानावर कोण?

Latest Marathi News Live Update : ग्रामीण भागातही गॅससाठी रांगा, मोवाड-नरखेडमध्ये नागरिकांची सकाळपासून गर्दी

Kolhapur Headmaster Tragedy : निलंबनाचे नैराश्य मुख्याध्यापकाने थेट आंब्याच्या झाडाला घेतला गळफास, कोल्हापुरातील घटना

Gold Rate Today: सलग तिसऱ्या दिवशी सोनं स्वस्त! 20 दिवसांतील सर्वात कमी दर, 10 तोळ्यांमागे 36,500 रुपयांची घसरण; पाहा आजचा भाव

SCROLL FOR NEXT