zp  esakal
नाशिक

लाच प्रकरण : अटक टाळण्यासाठी शिक्षणाधिकारी झनकर न्यायालयात

सकाळ डिजिटल टीम

नाशिक : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ठाणे येथील पथकाने केलेल्या कारवाईतील प्रमुख संशयित माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली वीर-झनकर मात्र पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाल्याने एकच खळबळ उडाली होती. दरम्यान झनकर यांनी अटक टाळण्यासाठी जिल्हा न्यायालयात धाव घेतली असून न्यायमुर्ती एम.एच.शेख यांच्या कोर्टात उद्या सुनावणी होणार आहे. अँड. अविनाश भिडे यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिन अर्ज दाखल केला.

काय आहे प्रकार

रेवती शिक्षण संस्थेच्या नोव्हेंबर २०२० मध्ये २० टक्के अनुदान मंजूर झालेल्या चार शाळांतील ३२ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मंजूर अनुदानानुसार नियमित वेतन मिळण्यात शिक्षण विभागाकडून अडवणूक सुरू होती. त्रस्त संस्थाचालक व कर्मचाऱ्यांचा जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी वैशाली वीर-झनकर यांच्याकडे पाच ते सहा महिन्यांपासून चकरा मारल्या. गेल्या महिन्यात संशयित वैशाली वीर-झनकर यांनी ३२ कर्मचाऱ्यांच्या नियमित वेतनापोटी नऊ लाख रुपयांची मागणी केली. संस्थाचालकांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केली. त्यानुसार ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्र्यंबक रोड भागात सापळा लावला. त्यात वैशाली वीर-झनकर यांच्यासह यातील मध्यस्थी करणारा शिक्षक पंकज रमेश दशपुते (वय ३८), चालक ज्ञानेश्वर सूर्यभान येवले (४९, मेहरधाम, पेठ रोड) यांना आठ लाख रुपये घेताना पकडले. संशयित येवले यांनी दोघांना जिल्हा परिषदेच्या बाहेर घेऊन जात होली क्रॉस चर्च परिसरात लाचेची रक्कम स्वीकारली. दबा धरून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने येवले यास लाचेच्या रकमेसह ताब्यात घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT