bribe esakal
नाशिक

नाशिक : लाचखोर शिक्षणाधिकारीची मालमत्ता वाचून व्हाल थक्क!

विनोद बेदरकर

नाशिक : कारवाईच्या भीतीने फरार झालेल्या माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ वैशाली वीर झनकर यांना पोलिसांनी (nashik police) अखेर अटक केली आहे. गेल्या महिन्यात संशयित वैशाली वीर-झनकर यांनी ३२ कर्मचाऱ्यांच्या नियमित वेतनापोटी नऊ लाख रुपयांची (bribe) मागणी केली होती. दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने संशयितांच्या घरांची झडती घेतली असून झनकर यांच्या मालमत्तेचा शोध लागला आहे.

मालमत्तांची चौकशी

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने संशयितांच्या घरांची झडती घेतली असून, यापैकी वीर यांच्या नावे वेगवेगळ्या ठिकाणी चार फ्लॅट, जमीन, कार, दुचाकी तसेच ४० हजारांची रोकड आणि काही बँकांचे पासबुक असल्याचे आढळून आले. वीर यांच्या घराच्या झडतीत त्यांच्या नावे मुरबाड, कल्याण रोड येथे एक फ्लॅट, नाशिक, शिवाजीनगर येथे एक फ्लॅट, सिन्नरला ०.५७ गुंठे जमीन, मिलिंदनगर, कल्याण ३१.७० गुंठे, १०.०८ गुंठे, ४०.८० आणि १३.१० गुंठे जमीन, सिन्नरमध्येच आणखीन ०.५६ गुंठे, ०१.५१ गुंठे, ०३.४१ गुंठे जमीन असून, कल्याण गंधारे येथे एक फ्लॅट, नाशिकला गंगापूर रस्त्यावर एक फ्लॅट, सिन्नरमध्ये ०.२२.७० गुंठे क्षेत्राची मालमत्ता, ४० हजारांची रोकड, होंडा सिटी कार, दुचाकी आणि वेगवेगळ्या बँकेचे पासबुकही मिळाले आहेत.

इतर दोघांच्या मालमत्तांची चौकशी

संशयित येवले यांच्या घरझडतीत त्यांच्यासह पत्नी आणि मुलांच्या नावाने वेगवेगळ्या बँकेच्या पासबुकसह दोन गाड्यांचे आरसीबुक मिळाले आहे. दशपुते यांच्या नावे नाशिक येथे ते राहत असलेला टू बीएचकेचा फ्लॅट, दुचाकी आणि तीन बँक खाती असल्याची बाब समोर आली आहे. मालमत्तांचा शोध सुरूच असून, झनकर यांच्या अटकेनंतर आणखी काही बाबी समोर येतील, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. प्रमाणीत उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता असल्यास संबंधितांना या मालमत्तेचा स्त्रोतही स्पष्ट करावा लागतो; अन्यथा अपसंपदा जमा केल्याप्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया ‘एसीबी’तर्फे राबविली जाऊ शकते.

संशियतांचीही आज न्यायालयात हजेरी

वैशाली वीर यांनी नाशिक येथील एम. एच. शेख यांच्या न्यायालयात ॲड. अविनाश भिडे यांच्यामार्फत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला. दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे फरारी वैशाली वीर-झनकर यांच्या अटकपूर्व अर्जावर न्यायालयात शुक्रवारी (ता.१३) सुनावणी होती. तसेच ‘एसीबी’च्या कोठडीत असलेल्या इतर दोघा संशयितांची उद्या कोठडीची मुदत संपत आहे. त्यांनादेखील न्यायालयात हजर केले. यावेळी तपासाच्या दृष्टीने ‘एसीबी’ची काय भूमिका असेल, हे उद्याच्या सुनावणीवेळीच स्पष्ट होईल.

सुनावणीवेळी झनकर उपस्थित नव्हत्या.

शिक्षण संस्थेच्या प्रशासकीय कामाच्या मंजुरीसाठी नऊ लाखांच्या लाचेची मागणी करून आठ लाखांची लाच स्वीकारण्याचा श्रीमती झनकर यांच्यावर आरोप आहे. झनकर यांच्यासह प्राथमिक शिक्षक पंकज दशपुते आणि शासकीय वाहनचालक ज्ञानेश्वर येवले यांचा यात समावेश होता. या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली असून, न्यायालयाने १३ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली आहे. पोलिसांना बुधवार सकाळपासून गुंगारा देत फरारी असलेल्या वीर यांच्या चौकशीसाठी त्यांच्या मागावर तीन पथके रवाना केली. हा तपास सुरू असताना गुरुवारी (ता. १२) ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. अविनाश भिडे यांच्यातर्फे जिल्हा व सत्र न्यायालयात वीर- झनकर यांनी अटकपूर्व जामीन अर्ज सादर केला. सुनावणीवेळी झनकर उपस्थित नव्हत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT