ZP Nashik  esakal
नाशिक

Nashik ZP News : जि.प. च्या मिशन भगीरथमधील अडथळे दूर; 60:40 च्या बंधनातून मुक्ती

जिल्ह्यातील आमदारांनी रोजगार हमी मंत्रालयातून मंजूर करून आणलेल्या १२५ कोटी रुपयांच्या १०८९ कुशल कामांचा समावेश रोजगार हमीच्या जिल्हा आराखड्यात होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik ZP News : जिल्ह्यातील आमदारांनी रोजगार हमी मंत्रालयातून मंजूर करून आणलेल्या १२५ कोटी रुपयांच्या १०८९ कुशल कामांचा समावेश रोजगार हमीच्या जिल्हा आराखड्यात होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

यामुळे जिल्हा परिषदेने सुटकेचा निःश्वास टाकला आहे.(ZP Remove obstacles in Mission Bhagiratha nashik news)

अतिरिक्त कुशल कामांमुळे निर्माण होणारा रोजगार हमीच्या जिल्हा आराखड्यातील ताण कमी होणार आहे. यामुळे जिल्हा परिषदेने पुढील वर्षासाठी मिशन भगिरथ प्रयास या योजनेच्या नवीन आराखड्याच्या तयारीस सुरवात केली आहे. जिल्हा परिषदेने या आर्थिक वर्षात रोजगार हमी योजनेतून मिशन भगिरथ प्रयास ही योजना सुरू केली आहे.

या योजनेतून पहिल्या वर्षी ६१० बंधारे उभारण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यातील ३६५ बंधारे उभारण्यास मंजुरी देण्यात आली. त्यातील १५२ कामे पूर्ण करण्यात आली आहेत. जि.प. च्या ग्रामपंचायत विभागाने रोजगार हमी जिल्हा आराखड्यातील कामांचे कुशल व अकुशलचे प्रमाण निश्चित ठेवून आराखडा मंजूर केला.

मात्र, मिशन भगिरथमधील ११० कोटींचे बंधारे, मातोश्री पाणंद रस्ते योजनेतील जवळपास चारशे कोटींची कामे व अतिरिक्त कुशलमधील १२५ कोटींची कामे ९५ टक्के कुशल व पाच टक्के अकुशल या प्रमाणे करण्याच्या कामांची त्यात भर पडली. यामुळे जिल्ह्यातील रोजगार हमीच्या योजनांच्या कामांचा ६०:४० चे प्रमाण धोक्यात आले.

अकुशल कामांचे कितीही प्रमाण वाढवले, तरी या ६०० कोटींच्या कुशल कामांची व अकुशल कामांशी सांगड घालणे जिल्हा परिषदेला अवघड होते. यामुळे पाणंद रस्ते असो वा अतिरिक्त कुशलची कामे यांना पंचायत समितीस्तरावरून कार्यारंभ आदेश दिले जात नव्हते. अखेरीस रोजगार हमी मंत्रालयाने जिल्हास्तरावरील रोजगार हमी आराखड्यातील ६०:४० च्या प्रमाणात अतिरिक्त कुशल कामांचा समावेश करण्यात येणार नसल्याचे सांगितले.

यामुळे जिल्हास्तरावरील रोजगार हमीच्या आराखड्यावरील अतिरिक्त कुशल कामांचा बोजा कमी झाला आहे. यामुळे जिल्हा परिषदेने आता मिशन भगिरथची उरलेली कामे येत्या मार्चपर्यंत मार्गी लावण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.

कामांना येणार गती

जिल्ह्यातील आमदारांनी रोजगार हमी मंत्रालयातून अतिरिक्त कुशलची १२५ कोटींची १०८९ कामे मंजूर करून आणली आहेत. या कामांना आता रोजगार हमीच्या ६०:४० च्या प्रमाणाचे बंधन उरलेले नाही.यामुळे ही कामे वेगाने सुरू होणार असून कामालाही गती येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे – एकनाथ शिंदे

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT