The chairman members of the management committee and parents of the village locking the Sakora Zilla Parishad school due to lack of teachers esakal
नाशिक

Nashik News: ZP शाळेला पालकांनी ठोकले ताळे! महिन्याभरात शिक्षकांच्या नेमणुकीचे आश्‍वासन

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : तीन वर्षापासून शाळेत शिक्षकांची संख्या अपुरी असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याच्या पाश्‍र्वभूमीवर शालेय व्यवस्थापन समिती आणि पालकांनी गुरुवारी (ता. १७) सकाळी साकोरा (ता. नांदगाव) जिल्हा परिषद शाळेला टाळे ठोकत आपला रोष व्यक्त केला.

या प्रकाराची शिक्षण विभागाने तत्काळ दखल घेत शाळेला महिन्याभरासाठी तात्पुरते स्वरूपात तीन शिक्षकांची नियुक्ती केली.

मात्र यावर पालकांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर महिन्याभरात कायमस्वरूपी शिक्षकांची नियुक्ती करण्याचे आश्‍वासन शिक्षण विभागाने दिले. तब्बल तीन तास शाळा बंद होती. (ZP school locked by parents Assurance of appointment of teachers within month Nashik News)

साकोरा (ता.नांदगाव) येथील जिल्हा परिषद शाळा तालुक्यातील एक आदर्श जिल्हा परिषद शाळा आहे. या शाळेत ४६० विद्यार्थी संख्या असून शाळेत १२ शिक्षकांची पदे मंजूर आहे. ३० विद्यार्थ्यांसाठी १ शिक्षक याप्रमाणे ४६० विद्यार्थ्यांसाठी १२ शिक्षकांची गरज आहे.

मात्र गेल्या तीन वर्षापासून शाळेत ९ शिक्षक कार्यरत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून सातत्याने शिक्षकांची मागणी शाळेकडून केली जात आहे. मात्र अद्यापही शाळेला शिक्षक उपलब्ध झालेले नाही.

एका वर्गात ५० ते ६० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. साकोरा शाळेत तीन शिक्षकांची नेमणूक करण्यात यावी याबाबत तीन वर्षांपासून पालक मागणी करत आहेत.मात्र आजपर्यंत शैक्षणिक विभागाने या मागणीकडे दुर्लक्ष करून उडवाउडवीची उत्तरे दिली आहे.

वेळोवेळी मागणी करुनही शाळेला शिक्षक उपलब्ध होत नसल्याने संतप्त झालेले पालक आणि शालेय व्यवस्थापन समिती पदाधिकारी यांनी गुरुवारी (ता.१७) सकाळी शाळेला टाळे ठोकले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

घटनेची माहिती कळताच गटशिक्षणाधिकारी प्रमोद चिंचोले यांनी तत्काळ शाळेला भेट देऊन पालकांशी चर्चा केली. मात्र शिक्षक हजर होईपर्यंत कुलूप उघडणार नाही या पालकांच्या, समितीच्या ठाम निर्णयामुळे माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश बोरसे यांनी शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांच्याशी चर्चा केल्यानंतर ज्या शाळेत पटसंख्या कमी आहे.

त्याशाळेतील तीन शिक्षकांची महिन्याभरासाठी तात्पुरत्या स्वरुपात तत्काळ शाळेवर नियुक्ती करण्यात आली. मात्र पालक आणि समिती यांनी यावर विश्वास न ठेवात महिनाअखेर शाळेसाठी तीन शिक्षकांची नियुक्ती करण्याची मागणी केली.

जर मागणीचा विचार न केल्यास पंचायत समिती शिक्षण विभागास टाळे ठोकण्याचा इशारा दिला.

यावेळी शालेय शिक्षण समिती अध्यक्ष विश्वनाथ बोरसे, अतुल पाटील, रमेश बोरसे, घन:श्याम सुरसे, देवदत्त सोनवणे, सुरेश बोरसे, किरण बोरसे, कल्पना निकम, सुनीता खैरनार, यमुना पाडवी, नामदेव बोरसे, ज्ञानेश्वर सुरसे, निकीता पाटील, भामाबाई बोरसे, मधूकर सूर्यवंशी, आनंदा खैरनार, पोपट बोरसे, योगेश बोरसे, योगेश खोंडे, प्रशांत बोरसे, जयवंत सुरसे, बिपीन निकम, गोकूळ बोरसे, चेतन निकम आदींसह पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Angar Election: राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद का झाला? 'या' होणार बिनविरोध नगराध्यक्ष?

IND W vs BAN W: वर्ल्ड कप जिंकल्यानंतर होणारी भारतीय संघाची मालिका BCCI कडून स्थगित! जाणून घ्या सविस्तर

Ranji Trophy: महाराष्ट्राचा एकाच डावाने दणदणीत विजय; विकी ओत्सावल अन् राजवर्धन हंगारगेकरच्या मिळून ११ विकेट्स

Gorakhpur Mumbai Train Bomb Threat : गोरखपूर-मुंबई पॅसेंजर ट्रेनमध्ये बॉम्बची धमकी; प्रवशांमध्ये खळबळ अन् शोधमोहीम सुरू

Latest Marathi Breaking News: कामातील निष्काळजीपणा भोवला, दोन अभियंते निलंबित

SCROLL FOR NEXT