Ashima Mittal, Chief Executive Officer of Zilla Parishad while inaugurating the Zilla Parishad staff and officials by releasing balloons of the sports competition. esakal
नाशिक

ZP Sports Competition : जि. प. कर्मचाऱ्यांच्या स्पर्धांना प्रारंभ; 3 दिवस रंगणार थरार

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील खेळाडूंचा वेगळा पोशाख, त्यांनी दिमाखात केलेले संचलन आणि लक्षवेधी ठरलेली घोडेस्वारी... एखाद्या जिल्हास्तरीय स्पर्धेला लाजवेल, अशा दिमाखदार पद्धतीने जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी स्पर्धेचे गुरुवारी (ता. २) येथील छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये उद्‍घाटन झाले.

पुढील तीन दिवस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या स्पर्धा रंगणार आहेत. (ZP Sports Competition zp employee competitions 3 days of thrill nashik news)

जिल्हा परिषद क्रीडा स्पर्धेवेळी अश्‍वावर स्वार होत राइड करताना अतरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे.

राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षक अनिरुद्ध अथानी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते या स्पर्धांचे औपचारिक उद्‍घाटन झाले. श्री. अथानी म्हणाले, की यापूर्वी जिल्हा परिषदेच्या अशा स्वरूपाच्या स्पर्धा कधी बघितल्या नाहीत.

छान संचलन, उत्कृष्ट बँड, हॉर्सरायडिंग असे प्रात्यक्षिक पाहिले नाही. ते येथे पाहायला मिळाले. खेळ हा सर्व काही शिकवतो, न खेळल्यास दुर्धर आजारांना समोर जावे लागते. त्यामुळे खेळ खेळा व त्यात सातत्य ठेवा.

श्रीमती मित्तल म्हणाल्या, की खेळाडू कधीही अपयशाला घाबरत नाहीत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांसाठी या स्पर्धा घेतल्या. पुढील वर्षी अधिक नियोजित स्पर्धा घेण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.

पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ यांनी खेळाडूंना शपथ दिली. विशाल हांडोरे, कानिफ फडोळ, दर्शना थाळकर यांनी क्रीडाज्योत आणली. सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंदराव पिंगळे यांनी प्रास्ताविक केले.

भोसला मिलिटरी स्कूलच्या बँड पथकाचे मार्च सादरीकरण व संचलन केले. दरम्यान, उद्‍घाटन सोहळ्याच्या संचलनात निफाडने प्रथम क्रमांक मिळवला, तर द्वितीय सुरगाणा, तृतीय नाशिक पंचायत समितीने पटकावला.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

जिल्हा परिषद क्रीडा स्पर्धेत लक्षवेधी ठरलेले भोसला मिलिटरी स्कूलच्या मुलींचे ढोल पथक.

स्पर्धकांसाठी पाणी, रुग्णवाहिका

जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर २, ३ व ५ असे तीन दिवस या स्पर्धा विविध गटांत रंगणार आहेत. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंसाठी पाण्याची व्यवस्था व जखमी खेळाडूंच्या उपचारार्थ प्रथमोपचारासह रुग्णवाहिकाही उपलब्ध केली आहे. यापूर्वी या सुविधा न पुरवल्याने ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांनी याविषयी नाराजी व्यक्त केली होती.

अर्जुन गुंडे यांनी वेधले लक्ष

जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे घोड्यांचे खास माहितगार असून, त्यांना घोड्यांची विशेष आवड आहे. त्यांना जातिवंत घोड्यांची चांगलीच पारख आहे हे फार कमी जणांना माहिती आहे.

पण त्यांनी आज आपल्यातील कौशल्याची चुणूक दाखवीत अगदी सराईतपणे घोडेस्वारी करीत सगळ्यांना आश्‍चर्याचा धक्का दिला अन् खऱ्या अर्थाने जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या स्पर्धेचा श्रीगणेशा केला. त्यांच्यासह भोसला मिलिटरी स्कूलच्या अश्वदलाच्या सहकाऱ्यांनी घोडेस्वारी केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दाखविलेल्या उत्साहामुळे कर्मचारीही आनंदीत झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: बुमराह लॉर्ड्स कसोटीत खेळणार की नाही? दुसऱ्या कसोटी विजयानंतर कॅप्टन गिलने स्पष्ट शब्दात सांगितलं

Ujani Dam Water: 'उजनीतून पाणी सोडण्याचा निर्णय एक दिवस लांबणीवर'; पंढरपुरातील वारकऱ्यांच्या गर्दीमुळे घेतला निर्णय

CA Final 2025 Results: सोशल मीडियापासून दूर राहिलो, आणि देशात टॉप आलो! सीए टॉपर्सची यशोगाथा

Pune : गांधीजींच्या पुतळ्याचं डोकं उडवण्याचा प्रयत्न, एकाला अटक; काँग्रेस करणार आंदोलन

Raigad Suspicious Boat : अलिबागजवळ समुद्रात आढळलेली संशयास्पद बोट बेपत्ता, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर; हेलिकॉप्टरद्वारे शोध सुरु

SCROLL FOR NEXT