Nashik ZP CEO Ashima Mittal esakal
नाशिक

Nashik : ZP राबविणार ‘Super 50’ उपक्रम

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : आदिवासी विकास विभागाच्या धर्तीवर नाशिक जिल्हा परिषदेकडून ग्रामीण भागातील अनुसूचित जाती व अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील निवडक ५० विद्यार्थ्यांना वैद्यकीय, अभियांत्रिकीचे धडे गिरविण्याची संधी मिळणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेकडून ‘सुपर ५०’ हा उपक्रम राबविला जाणार आहे. यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी पुढाकार घेतला आहे. (ZP will implement Super 50 initiative by CEO ashima mittal nashik Latest Marathi News)

या उपक्रमांतर्गत अनुसूचित जाती/जमाती या प्रवर्गातील सन २०२२-२३ मध्ये इयत्ता ११ वी विज्ञान शाखेतील अनुदानित, अंशतः अनुदानित कनिष्ठ महाविद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालये, आश्रमशाळेतील प्रवेशीत विद्यार्थ्यांकरिता निवासी स्वरूपात नियमित अभ्यासक्रमाबरोबर सीईटी, जेईई (CET/JEE) या पात्रता परीक्षेकरीता ५० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण आणि मार्गदर्शन करण्यात आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाकडून संपूर्ण जिल्ह्यातून यासाठी एक पात्रता परीक्षा घेतली जाणार आहे. यामधील ५० विद्यार्थ्यांची निवड ही ‘सुपर ५०’ उपक्रमांतर्गत करण्यात येणार आहे.

ऑनलाइन नोंदणी

या उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना पूर्व परीक्षेला बसण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करायची आहे. त्याचसोबत विहित नमुन्यात विद्यार्थ्यांना आपल्या महाविद्यालयाकडे देखील चार नोव्हेंबर २०२२ पर्यंत नोंदणी करता येणार आहे. नोंदणीसाठी https://forms.gle/p5n5suWvFQSM3iR57 येथे संपर्क साधावा.

उपक्रमांच्या अटी पुढीलप्रमाणे

- विद्यार्थी ग्रामीण भागातील अनुसूचित जाती व जमाती या प्रवर्गातील असावा

- विद्यार्थी नाशिकमध्ये ११ वी विज्ञान शाखेत (आश्रमशाळा, अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, उच्च माध्यमिक विद्यालय) प्रवेशीत असावा

- विद्यार्थ्यास इयत्ता १० वी मध्ये किमान ६५ % गुण प्राप्त झालेले असावे.

- योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक असणारा विद्यार्थ्यास दोन वर्षासाठी प्रशिक्षण व सर्व अध्यापन निवासी शाळेत निःशुल्क असेल

- उपक्रमासाठी विद्यार्थ्याची व पालकांची संमती असावी.

- योजनेचा लाभ देण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना निवड चाचणी परीक्षा अनिवार्य राहील

- निवड चाचणी परीक्षेत मेरिट नुसार उच्चतम गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची निवड मर्यादित स्वरूपात करण्यात येईल.

"ग्रामीण भागातील हुशार विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी चांगल्या संधी उपलब्ध व्हाव्यात या हेतूने ‘सुपर ५०’ हा उपक्रम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून हाती घेण्यात आला आहे. ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना या उपक्रमांतर्गत तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यामुळे या उपक्रमात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा."

- आशिमा मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT