नांदगाव पोलिस  sakal
नाशिक

नाशिक : कौटुंबिक भांडणातून दोन गटांत हाणामारी

अस्वलदऱ्यातील दोन गटांचा समावेश, महिला जखमी

सकाळ वृत्तसेवा

नांदगाव: कौटुंबिक भांडणातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना शुक्रवारी (ता. १८) उघडकीस आली. या हाणामारीत दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. पोलिस ठाण्याबाहेरच हाणामारी झाल्याने परिसरात बघ्यांची गर्दी जमली होती. दरम्यान पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत भांडणाची कुरापत काढणाऱ्या संशयितांचा अस्वलदऱ्यात शोध घेतला गेला.

शुक्रवारी सायंकाळी येथील पोलिस स्थानकाबाहेरच महिलांचे दोन गट एकमेकांत भिडले. भांडणाचे कारण सुरुवातीला काही कळाले नाही. दोन गटाच्या भांडणात अचानक कुणीतरी दगड भिरकावल्याने प्रकरण अधिक चिघळून भांडणाचे रूपांतर हाणामारीत झाले. दगडफेकीला सुरुवात झाल्याने पळापळ सुरू झाली.

अस्वलदऱ्यातील दोघं गट असल्याचा संशय पोलिसांना आहे. दरम्यान या हाणामारीत दोन महिला जखमी झाल्या आहेत. थेट पोलिस स्थानकाबाहेर सुरू असलेली धुमश्चक्रीपासून अनभिज्ञ असलेल्या पोलिसांना घटनेची माहिती कळताच ते बाहेर आले. पोलिसांकडून किरकोळ लाठीमार करण्यात आला. जखमी महिलांना सरकारी दवाखान्यात हलविण्यात आले. दरम्यान, मिनी लखीम भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, नवरा नांदवायला तयार असताना मावस सासू व दीर हे एकत्रित राहू देत नसल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला आहे. संशयित मुन्ना भोसले, बाजी भोसले, बाळू भोसले, भावड्या भोसले आदींविरोधात तक्रार दाखल केली असून दुसऱ्या गटाने उशिरापर्यंत तक्रार दाखल केली नव्हती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जीवनमान-जीवनभान : व्यायामाने जपूया मानसिक आरोग्य

Pimpri Raja Accident: पिंप्री राजा गणेश मिरवणुकीत बेकाबू ट्रेलर घुसला; दोघांचा मृत्यू, सात जखमी, गावावर शोककळा

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

SCROLL FOR NEXT