camal navapur truck
camal navapur truck 
उत्तर महाराष्ट्र

ट्रकमध्ये कोंबले अठरा उंट 

सकाळ वृत्तसेवा

नवापूर : गुजरात राज्यातील पुष्कर येथून सोलापूर येथे विना परवाना अठरा उंट घेऊन जाणाऱ्या ट्रक गोरक्षा समितीच्या युवकांनी पकडले. नागपूर- सुरत राष्ट्रीय महामार्गावरील नवापूरजवळील वाकीपाडा पुलाजवळ सकाळी साडेदहाला ट्रकला पकडले असता अठरा उंट एकाच ट्रकमध्ये कोंबले असल्याचे निदर्शनास आले. सदर ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. 
नागपूर- सुरत महामार्गावर नवापूरजवळून ट्रक (क्र. आरजे 14, एमजे 9572) आज सकाळी मार्गस्थ होत होता. या दरम्यान नवापूर येथील गौसेवक अक्षीत अग्रवाल व दर्शन पाटील हे सोनगड जात असताना त्यांना ट्रकमध्ये उंट असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी ट्रकला थांबवून विचारणा केली. तत्काळ गौसेवक जितेंद्र अहिरे, राहुल मराठे व रामू गिरासे यांना बोलावून घेतले. सोबत पोलिसांना ट्रकची माहिती देऊन घटनास्थळी बोलावले. ट्रकमध्ये मूक जनावर असल्याची माहिती मिळाल्याने नवापूर पोलिसांच्या मदतीने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर हॉटेल राजेशजवळ राजस्थान राज्याची पासिंग असलेल्या ट्रकची तपासणी केली असता; त्यात अठरा उंट कोंबून भरलेले आढळले. नवापूर पोलिसांनी पुढील कारवाईसाठी ट्रक पोलिस ठाण्यात आणले.

पुष्कर ते सोलापूर प्रवास
पोलिसांकडून ट्रक चालकास विचारणा केल्यानंतर सदर उंट गुजरात राज्यातील पुष्कर येथून खरेदी करून सोलापूरला जात असल्याचे सांगितले. मात्र ट्रकची क्षमता नसताना अठरा उंटांना तोंड बांधून घेऊन जात असल्याने त्यांच्यावर नवापूर पोलिस ठाण्यात विना परवाना मूक प्राण्यांची वाहतूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. ट्रक चालक खालील मामला व सलमान फरमान कुरेशी यांना ताब्यात घेतले आहे. पुढील कारवाई पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक डिगंबर शिंपी व पो. कॉ. तोरवणे व आदित्य गोसावी तपास करत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT